Favarni Pump Yojana : शेतकऱ्यांनो फवारणी यंत्र खरेदीवर सरकार देतंय ‘50%’ अनुदान; असा करा अर्ज, जाणून घ्या सविस्तर..

Favarni Pump Yojana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Favarni Pump Yojana : शेतकऱ्यांना शेती करताना बऱ्याच उपकरणांची गरज भासत असते. जर शेतकऱ्याकडे स्वतःची उपकरणे असतील तर त्या शेतकऱ्यांना शेतीतून चांगला फायदा मिळतो. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःची उपकरणे नसतात त्यांना ती भाड्याने घ्यावी लागतात त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतीत बराच खर्च होत असतो. त्यामुळे शेतीतील कृषी यंत्रांची (agricultural machinery) उपयुक्तता लक्षात घेऊन सरकार (Maharashtra Government) शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि इतर कृषी यंत्रांवर अनुदानाचा लाभ देते.

शेतकऱ्यांना स्वस्त दरात कृषी यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार विविध अनुदान (Government Subsidy) देत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना फवारणी यंत्रावर (Spraying machine) अनुदानाचा लाभही दिला जातो. साधारणपणे, सरकारकडून शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान दिले जाते. फवारणी यंत्राच्या साहाय्याने शेतकरी त्यांच्या पिकांवर सहज कीटकनाशकांची फवारणी करू शकतात. त्यामुळे पीक चांगले येऊन शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो.

या अँप वरून मिळवा सरकारी योजनांचा लाभ (Favarni Pump Yojana)

शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आता टेन्शन घ्यायची गरज नाही. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi अँप डाउनलोड करावे लागेल. हॅलो कृषी अँपवर तुम्ही घरबसल्या कोणत्याही सरकारी योजनाला अर्ज करून सहज लाभार्थी बनू शकता. हॅलो कृषी मोबाईल अँपवर रोजचा बाजारभाव, जमीन खरेदी विक्री, हवामान अंदाज, जमीन मोजणी इत्यादी सेवा मोफत दिल्या जातात. त्यामुळे लगेचच गुगल प्ले स्टोअरवर जा आणि Hello Krushi अँप डाउनलोड करा.

आजच्या लेखामध्ये आपण शेतकऱ्यांना मिळणाऱ्या फवारणी यंत्रावरील अनुदानाची माहिती पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दलची संपूर्ण माहिती.

फवारणी यंत्र म्हणजे काय?

फवारणी यंत्र (Favarni Pump Yojana) हे असे कृषी उपकरण आहे ज्याच्या मदतीने शेतकरी द्रव खते आणि कीटकनाशकांची (Liquid fertilizers and pesticides) सहज फवारणी करू शकतात. या यंत्राचा वापर करून कमी वेळात अधिक पिकांवर कीटकनाशकाची फवारणी करता येते. शेतकरी हे यंत्र स्वतः चालवू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वेळेची देखील मोठ्या प्रमाणावर बचत होते तसेच जास्त पैसे देखील खर्च होत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो.

फवारणी यंत्राचे प्रकार

बाजारात दोन प्रकारची फवारणी यंत्रे उपलब्ध आहेत. पहिले ट्रॅक्टर ड्रॉन फवारणी यंत्र आणि दुसरे बॅटरी ऑपरेटेड फवारणी यंत्र (A tractor drone sprayer and another battery operated sprayer) आहे. ट्रॅक्टरवर चालणारे फवारणी यंत्र ट्रॅक्टरला जोडून चालवले जाते, तर बॅटरीवर चालणारे मशीन कुठेही हलवता येते. ज्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर आहे ते ट्रॅक्टरवर चालणारे यंत्र वापरू शकतात, तर ज्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर नाही त्यांच्यासाठी बॅटरीवर चालणारे यंत्र चांगले आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांना जे योग्य वाटेल असे फवारणी यंत्र घेता येते.

सर्वात स्वस्त शेती उपकरणे कुठे मिळतात?

आता शेतकऱ्यांना अतिशय कमी दरात शेतीउपयोगी उपकरणे मिळत आहेत. यासाठी शेतकऱ्यांना गुगल प्ले स्तवरावरील Hello Krushi नावाचे मोबाईल अँप अतिशय उपयोगी ठरत आहे. येथे महाराष्ट्रातील अनेक दुकानदार आपल्याकडील शेतीउपयोगी उपकरणे होलसेल दरात विक्री करतात. तेव्हा तुम्हाला स्वतःचा फायदा करून घ्यायचा असेल आणि पैशांची बचत करायची असेल तर आजच खालील हिरव्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून किंवा गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi अँप डाउनलोड करा.

फवारणी यंत्रावर किती अनुदान मिळते?

फवारणी यंत्रावर सरकारकडून ५० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय आणि महिला शेतकरी यांना प्राधान्य दिले जाते. या अंतर्गत त्यांना 50 टक्क्यांपर्यंत सबसिडीचा लाभ देखील दिला जातो. तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना फवारणी यंत्रावर ४० टक्के अनुदान दिले जाते.

फवारणी यंत्राची किंमत किती आहे?

जर आपण फवारणी यंत्राच्या किंमतीबद्दल पाहिलं तर त्याची किंमत ब्रँड आणि गुणवत्तेनुसार बदलते. फवारणी यंत्र १९९९ रुपयांपासून ते १. लाख रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांना जशी गरज आहे त्यानुसार ते हे फवारणी यंत्र खरेदी करू शकता. Favarni Pump Yojana

फवारणी यंत्रावरील अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे

  • अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे आधार कार्ड
  • अर्जदार शेतकऱ्याचे मूळ रहिवासी प्रमाणपत्र
  • अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे बँक खाते तपशील, त्यासाठी पासबुकची प्रत
  • अर्जदार शेतकऱ्याचे जात प्रमाणपत्र (SC, ST साठी लागू असल्यास)
  • अर्जदाराचा मोबाईल क्रमांक जो आधारशी लिंक आहे

फवारणी यंत्रासाठीअर्ज कसा करावा?

शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना अनुदानावर फवारणी यंत्र उपलब्ध करून देण्यासाठी वेळोवेळी अर्ज मागविण्यात येतात. राज्य सरकार कृषी यंत्र योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर फवारणी यंत्रासाठी अर्ज मागवतात. यामध्ये अर्ज करून शेतकरी बांधव फवारणी यंत्रासाठी अनुदानाचा लाभ घेऊ शकतात. कृषी यांत्रिकीकरण योजना बिहार, कृषी यांत्रिकीकरण योजना उत्तर प्रदेश, ई-कृषी अनुदान योजना मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना फवारणीसाठी अनुदानाचा लाभ दिला जातो. राज्य सरकारच्या योजनेंतर्गत शेतकरी अर्ज करू शकतात. अर्ज आणि अनुदानाबाबत अधिक माहितीसाठी शेतकरी त्यांच्या जिल्ह्यातील कृषी विभागाशी संपर्क साधू शकतात.