Ration Card : गोरगरीब लोकांना स्वस्तात धान्य मिळवायचं एकच साधन आहे ते म्हणजे रेशन दुकान. या ठिकाणी गोरगरीब जनता अगदी कमी पैशामध्ये धान्य घेऊ शकते. बरेच लोक यावर उदानिर्वाह करून जगतात. मात्र अलीकडील काळात यामध्ये देखील लोकांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढत चालले. गरीब लोकांना काही समजत नाही असं म्हणून रेशन दुकानदार त्यांची फसवणूक करताना दिसतात. अशा फसवणुकीच्या अनेक घटना देखील समोर आल्या आहेत.
जर तुमच्या गावातील किंवा शहरातील रेशन दुकानदार कमी धान्य देऊन जास्त पैसे घेतायेत किंवा तुम्हाला रेशनकार्ड देत नाही. धान्यच देत नाहीत अशा समस्या तुम्हाला असतील तर तुम्ही या दुकानदारांवर रीतसरपणे कारवाई करू शकता यामध्ये तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. आता ही कारवाई कशी करायची हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल? चलातर मग जाणून घेऊया याबद्दल माहिती. (Ration Card)
तुम्हाला कारवाई करण्यासाठी जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही यावर कारवाई करू शकता. तुम्हाला सर्वात आधी mahafood.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला उजव्या बाजूला ऑनलाईन सेवा हा बॉक्स दिसेल. त्यामध्ये ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली हा ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर पहिलाच ऑप्शन येईल तक्रार नोंदवा त्यावर क्लिक करा क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक फॉर्म येईल त्या ठिकाणी सर्व माहिती व्यवस्थितपणे भरून तो फॉर्म सबमिट करा. त्याचबरोबर तुम्ही ८०००२२४९५६ या तोल फ्री हेल्प लाईन नंबरवर कॉल करून तुम्ही तुमची तक्रार करू शकता. त्यानंतर ग्राहक सुरक्षा कायदयांतर्गत संबंधित दुकानदारावर कारवाई केली जाईल.
आमच्या ‘या’ अँपबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
शेतकरी मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी एक खास अँप आणलं आहे. यामध्ये तुम्हाला कृषीविषयक संपूर्ण माहिती मिळेल. Hello Krushi असं या अँपच नाव आहे. यामध्ये तुम्हाला बाजारभाव, हवामान अंदाज, जमीन मोजणी, रोपवाटिकांची माहिती, पशूंची खरेदी विक्री, सरकारी योजना, या सर्वांबद्दल माहिती अगदी मोफत मिळेल. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर Hello Krushi हे अँप लगेचच इंस्टाल करा.