Soyabean : महाराष्ट्रातील जवळपास 70 टक्के शेतकरी सोयाबीन पिकाचे लागवड करतात व त्याचे उत्पन्न घेतात परंतु सोयाबीन लागवडीपासून ते काढणीपर्यंत अनेक संकटांना त्यांना सामोरे जावे लागते त्यामध्ये महत्त्वाचे आणि मोठे संकट म्हणजे चक्रीभुंगा व खोडकिड , खोडमाशी हे मोठे संकट सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या डोक्यावर आहे. त्यामुळे सध्या सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहे. आपल्या सोयाबीन पिकामध्ये लक्षणे दिसत असतील तर नियंत्रणाचे उपाय कसे करायचे हे आज आपण या लेखमालेतून जाणून घेणार आहोत.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा
खोडमाशी नक्की काय करते अन कशी असते? (Melanagromyza sojae)
अंडी, अळी, कोष आणि प्रौढ अशा चार अवस्था
प्रौढ माशी आकाराने लहान, काळसर आणि चमकदार असून २ मि.मी. लांब
संपूर्ण आयुष्यक्रमामध्ये ७० ते ८० अंडी घालते.
अंड्यातून निघालेली पाय नसलेली २-४ मिमी लांब अळी प्रथम सोयाबीनची पाने पोखरून नंतर पानाच्या देठातून मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करून आतील भाग पोखरून खाते.
प्रादुर्भाव पिकाच्या रोपावस्थेत झाल्यास कीडग्रस्त झाड वाळते. परिणामी, पुनः पेरणी करण्यास भाग पडते किंवा उत्पादनात लक्षणीय घट येते. मोठ्या झाडांवर प्रादुर्भाव झाल्यास प्रौढ माशीला बाहेर येण्यासाठी केलेले छिद्र आढळते.
अळी आणि कोषावस्था फांद्यात किंवा खोडातच पूर्ण
प्रादुर्भावग्रस्त झाडावरील फुलांची गळ होते. उत्पादनात १६ ते ३० टक्क्यांपर्यंत घट येते.
खोडमाशी नियंत्रण कसे करावे?
प्रादुर्भावग्रस्त पाने, फांद्या आणि पानाच्या देठाचा अळीसह नायनाट करावा.
आर्थिक नुकसानीची पातळी (सोयाबीनची १० टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे) ओलांडल्यास खालीलपैकी एका कीटकनाशकाची फवारणी करावी. पाण्याचा सामू ६ ते ७ दरम्यान ठेवावा.
फवारणी – (प्रति लिटर पाणी)
(थायामेमिथोक्झाम १२.६% अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (९.५ % झेडसी) (0.5 मिलि.)