Pik Vima : शेतकऱ्यांना शेती करताना नैसर्गिक आपत्तीमुळे मोठा आर्थिक ताण सहन करावा लागतो. काही वेळेस अवकाळी पावसामुळे तर हातात तोंडाशी आलेला घास जमीनदोस्त होतो. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहते. याचा विचार करून राज्य सरकारने एक रुपयात पिक विमा योजना सुरू केली आहे. आता या योजनेचा राज्यातील अनेक शेतकरी लाभ घेत असल्याचे दिसत आहे. ही योजना सुरू करण्यात आल्यापासून आतापर्यंत जवळपास दीड कोटी शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद
शेतकरी बांधवांनी या खरीप हंगामामध्ये एक रुपया पिक विमा भरण्यास चांगला प्रतिसाद दिला असल्याचे देखील धनंजय मुंडे म्हणाले आहेत. दरम्यान पिक विमा भरण्याची अंतिम तारीख ही 31 जुलै ची होती मात्र 31 जुलै पर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांनी पिक विमा भरले नव्हते याचाच विचार करून राज्य सरकारने पिक विमा भरण्याच्या मुदतीमध्ये वाढ केली आहे. आता शेतकऱ्यांना तीन ऑगस्टपर्यंत पिक विमा साठी अर्ज भरण्यात येण्यात असल्याची माहिती देखील कृषिमंत्र्यांनी दिली आहे.
पिक विमा भरण्यासाठी असणारी वेबसाईट सतत हँग होत होती यामुळे शेतकऱ्यांचे पीक विमा लवकरात लवकर भरले जात नव्हते. शेतकऱ्यांना शेतातील कामे सोडून दिवसभर सीएससी केंद्रावर बसून राहायला लागायचं त्यातच काल हा विमा भरण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळे बरेच शेतकरी चिंतेत होते आपला विमा भरला जाईल की नाही? असा शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला होता. मात्र या गोष्टीकडे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विशेष लक्ष देऊन पिक विमा भरण्यासाठी वेबसाईट सुरळीत सुरू करून विमा भरण्याची मुदत देखील वाढवली आहे.
या जिल्ह्यांनी भरले पीक विमा अर्ज
- पुणे – १६,३६,३८०
- नाशिक – ११,१३,३५८
- कोल्हापूर – ४,७६१८७
- कोकण – १,७३,९५४
- छत्रपती संभाजीनगर – ३८,३०७८९
- लातूर – ३९,५९,३७०
- अमरावती – २७६-१९३
- नागपूर – १०,९७,५६७