Tilapiya fish । अशाप्रकारे होते तिलापिया माशांची वाढ, पालन केल्यास होईल चांगला फायदा; वाचा याबद्दल डिटेल माहिती

Tilapiya fish
Tilapiya fish
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Tilapiya fish । अलीकडच्या काळात मासे खाण्याचे प्रमाण वाढले आहे. सर्वच माशांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हे मासे लवकर खराब होतात. जर माशांना लवकरात लवकर बर्फात ठेवले नाही तर ते खाण्यालायक राहत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बर्फामध्ये मासे एकूण ३ ते ५ दिवस ताजे राहतात. माशांचे वेगवेगळे प्रकार आहेत. ते वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य खातात. असाच एक माशाचा प्रकार आहे, ज्याला बाजारात खूप मागणी आहे. जाणून घेऊयात त्याबाबत माहिती.

तिलापिया मासा

तिलापिया मासा खूप लोकप्रिय आहे. तो मूळचा आफ्रिकेचा असून निलोटीका तिलापिया आणि मोझांबिका तिलापिया अशा त्याच्या जाती आहेत. विशेष म्हणजे या दोन जातीच्या संकरातून रेड तिलापिया ही जात निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने १९५२ मध्ये हा मासा भारतात आणला. हे मासे खूप कमी वयात प्रजननक्षम होत असल्याने त्यावर व्यवसायिकदृष्ट्या मत्स्यशेती करताना निर्बंध येण्याची शक्यता असते.

गिफ्ट टेक्नॉलॉजी

व्यवसायिकदृष्ट्या मत्स्यशेती करताना निर्बंध येऊ नये म्हणून हे मासे लहान असतानाच त्यांना इंजेक्शन देऊन त्यांचे रुपांतर नर माशात करतात. अनेकजण गिफ्ट टेक्नॉलॉजीचा वापर करतात. त्यांना राजीव गांधी सेंटर फॉर अॅक़्वाकल्चरकडून तिलापियाचे मत्स्यबीज देण्यात येते. यात आठ विविध तिलापिया माशांच्या जातींचे संकर करण्यात आले आहे.

या माशांचे ब्रीडिंग झाल्यानंतर फलित अंडी मादीच्या तोंडात ठेवून अंड्याना ऊब देण्यात येते. त्यानंतर इनक्युबेशनमध्ये पिल्ले बाहेर आल्यास पहिल्या दिवसापासून ते २१ दिवसापर्यंत संप्रेरकाचे इंजेक्शन देऊन मादी पिल्लांचे नर पिल्लांत रुपांतर करतात. या माशांचे तलावामध्ये, पिंजऱ्यामध्ये संवर्धन केले जाते. परंतु त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य विभागामार्फत पूर्व परवानगी घेणे गरजेचे आहे.

शेतीसोबत जोडव्यवसाय करायचा असेल तर लगेचच करा हे काम

बरेच जण व्यवसाय सुरु करतात मात्र त्या व्यवसायाची जाहिरात कशी करायची हे समजत नाही. मात्र आता तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आमची तुमच्यासाठी Hello Krushi नावाचं एक खास अँप बनवलं आहे. आमच्या या ॲपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या व्यवसायाची मोफत जाहिरात करू शकता त्यामुळे लगेच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आपले Hello Krushi हे अँप तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा.

८० हजार अंडी देण्याची क्षमता

सोलापुरामधील उजनी प्रकल्पातून रेड तिलापिया माशांचे उत्पादन घेण्यात येते. तिलापियातील इतर माशांवर बंदीचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांची प्रजनन प्रक्रिया आहे. विशेष म्हणजे एक मादी मासा एका वेळी तब्बल ८० हजार अंडी देते. अनेकजण या माशाचे उत्पादन घेतात कारण याला बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.