Havaman Andaj : पुढील 4 दिवस महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, गणरायाच्या आगमनासोबत पाऊसही येणार

Havaman Andaj
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Havaman Andaj : बंगालच्या उपसागरावर असणारी प्रणाली ही राज्यापासून लांब आहे. राज्यावर कुठलीही मान्सून प्रणाली नाही त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस राज्यामध्ये हलक्या स्वरूपाची पावसाच्या शक्यता आहे असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. परंतु अरबी समुद्रावरून येणारे वारे तीव्र आहे. त्यामुळे कोकण, गोवा भागात तीन ते चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि गोव्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच दि. २१ व २२ सप्टेंबर रोजी पावसाची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात आज काही ठिकाणी तर उद्या तुरळ ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दि. २१ व २२ सप्टेंबर रोजी विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह तसेच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

राज्यातील धरणामध्ये पाणीसाठा कमी

राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी ९५ तालुक्यातील धरणामध्ये २० टक्क्यापेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यातील धरणामध्ये ६८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून गेल्या वर्षी तुलनेत यावर्षी हा पाणी साठा २० टक्क्यांनी कमी आहे. अनेक तालुक्यांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असल्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

Rahul Bhise
Bsc ऍग्रीचे शिक्षण पूर्ण झालेले असून शेती क्षेत्रात वार्तांकन करण्यामध्ये विशेष आवड. यशस्वी शेतकऱ्यांच्या कथा, शासकीय योजना, शेती प्रश्न आदी विषयांवर लिखाण करण्यात रस.