Govt Land : 38 लाख एकराचा मालक; वाचा… देशातील ‘हा’ जमीनदार आहे तरी कोण?

Govt Land Owner Of 38 Lakh Acres
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी आणि जमीन यांचा संबंध पूर्वापार चालत आलेला आहे. शेतकरी जमिनीला (Govt Land) ‘काळी आई’ मानतात. इतकेच नाही तर आपल्या पूर्वजांपासून मिळालेली वाडवडिलांच्या जमिनीची मालमत्ता शेतकऱ्यांनी ‘वारसा’ म्हणून जपली आहे. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का? देशात सर्वात जास्त जमीन कोणाकडे आहे? देशातील सर्वात ‘मोठा जमीनदार’ (Govt Land) कोण आहे? मात्र आता तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर या पोस्टच्या माध्यमातून मिळणार आहे.

‘हा’ जमीनदार आहे कोण? (Govt Land Owner Of 38 Lakh Acres)

देशात सर्वात जास्त 38 लाख 37 हजार 793 एकर जमीन असलेला जमीनदार आहे. आता तुम्हीही विचारात पडले असणार इतकी जमीन आहे तरी कुणाकडे? या 38 लाख 37 हजार 793 एकर जमिनीचा मालक आहे तरी कोण? असा कोण जमीनदार आहे ज्याने इतकी जमीन राखून ठेवली आहे? तर या जमिनीचा मालक दुसरा तिसरा कोणी नसून ‘भारत सरकार’ आहे. केंद्र सरकारच्या मालकीची ही 38 लाख 37 हजार 793 एकर जमीन आहे.

50 देशांचे क्षेत्रफळ कमी

भारत सरकारच्या सरकारी जमीन (Govt Land) माहिती प्रणाली (GLIS) संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, फेब्रुवारी 2021 पर्यंत भारत सरकारकडे जवळपास 15 हजार 531 चौरस किलोमीटर जमिनीची मालकी आहे. सरकारची ही जमीन 51 मंत्रालये आणि 116 सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडे आहे. सरकारी आकडेवारीनुसार रेल्वे विभागाकडे सर्वाधिक 2926.6 चौरस किलोमीटर जमीन आहे. विशेष म्हणजे जगातील सर्वात 50 लहान देशांचे क्षेत्रफळ हे भारत सरकारकडे असलेल्या जमिनीपेक्षा कमी आहे. त्यामुळे भारत सरकारकडे असलेल्या एकूण जमिनीचा ताबा हा विशेष मानला जात आहे.

दुसरा, तिसरा क्रमांक कोणाचा?

त्यानंतर आता जमीन राखून ठेवण्याच्या बाबतीत भारत सरकारनंतर दुसरा मोठा जमीनदार कोण असेल? असा देखील प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल. तर कॅथोलिक चर्च ऑफ इंडिया जमीन राखून ठेवण्याच्या बाबतीत दुसऱ्या तर वक्फ बोर्ड तिसऱ्या क्रमांकावर आहे. कॅथोलिक चर्च ऑफ इंडियाचे देशात स्वतःच्या जमिनीवर हजारो चर्च, ट्रस्ट, धर्मादाय संस्था, शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालये आहेत. याशिवाय वक्फ बोर्ड देखील देशभरात हजारो मशिदी, मदरसे आणि कब्रस्तान चालवते आणि या जमिनींचे ते मालक आहेत.

दरम्यान, सध्या जमिनीच्या किमती भरमसाठ वाढल्या असून, येत्या काही वर्षांमध्ये जमीन घेणे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर बाहेर जाणार आहे. लोकसंख्या वाढीमुळे जमिनीचे विभाजन होत असून, प्रति शेतकरी जमीन कमी होत चालली आहे. ज्यामुळे देशात अल्प भूधारक शेतकऱ्याची संख्या वाढली आहे. मात्र आहे त्या जमिनी जपणे हाच शेतकऱ्यांकडे उत्तम पर्याय असणार आहे.

Gorakshnath Thakare
सकाळ, ABP माझा, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. शेती क्षेत्रात विशेष रस असून शेतमाल प्रक्रिया उद्योग, बाजारभाव, वायदेबाजार, तंत्रज्ञान आदी विषयांची आवड आहे.