Bajra Farming : बाजरी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल; ‘या’ राज्यांमध्ये होते सर्वाधिक उत्पादन!

Bajra Farming Farmers Trend
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या बाजरी, ज्वारी या भरडधान्याच्या (Bajra Farming) मागणीत मोठी वाढ झाली आहे. 2023 वर्ष हे आंतरराष्ट्रीय मिलेट्स (भरडधान्य) वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. त्यामुळे बाजरीवर आधारित कृषी प्रक्रिया उद्योगांमध्येही मोठी वाढ झाली असून, बाजरीची सर्व देशभर चर्चा होत आहे. परिणामी ग्राहकांसोबतच शेतकऱ्यांचा देखील बाजरीचे पीक घेण्याकडे कल वाढतो आहे. याच पार्श्वभूमीवर बाजरी पिकाचे सर्वाधिक उत्पन्न कोणत्या राज्यात होते? बाजरीचे आरोग्याच्या दृष्टीने काय फायदे आहेत? शेतकऱ्यांना बाजरी हे पीक (Bajra Farming) कसे फायदेशीर असते. याबाबत आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

कोणते राज्य आघाडीवर? (Bajra Farming Farmers Trend)

देशात सर्वाधिक बाजरीचे उत्पादन राजस्थान या राज्यात होते. बाजरीच्या लागवडीसाठी येथील हवामान आणि माती खूपच चांगली आहे. देशातील एकूण बाजरी लागवडीपैकी 65 टक्के लागवड, तर 28.6 टक्के बाजरीचे उत्पादन हे एकट्या राजस्थानात होते. त्यानंतर दुसरा क्रमांक उत्तर प्रदेश, तिसरा क्रमांक गुजरात, तर चौथा क्रमांक महाराष्ट्राचा लागतो.

बाजरीचे गुणधर्म

बाजरीमध्ये प्रथिनांचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या जास्त असल्याने भारतात बाजरीचा उपयोग खाद्यासाठी – प्रामुख्याने भाकरी बनवण्यासाठी – मोठ्या प्रमाणावर केला जातो. महाराष्टातील ग्रामीण भागात बाजरीपासून वाळवणाचे पदार्थ बनवले जातात. तसेच काही धार्मिक सणावारामध्ये बाजरीला महत्त्व दिले जाते. बाजरीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस यासारखे घटक आढळतात. जे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचे पोषक घटक मानले जातात. रक्तदाब, कोलेस्ट्रॉल यासारख्या आजारांवर नियंत्रण राखण्यासाठी ही पोषक तत्व शरीराला आवश्यक असतात. बाजरीच्या याच गुणधर्मांमुळे डॉक्टर देखील आहारात आरोग्यदायी बाजरीच्या भाकरीचा समावेश करण्याचा सल्ला देतात.

शेतकऱ्यांना ‘असाही’ फायदा

बाजरी हे भरडधान्य असून, ते पावसाचे प्रमाण कमी असलेल्या भागात घेतले जाते. उष्ण व कोरडे हवामान या पिकास चांगले मानवते. विशेष म्हणजे या पिकाला अधिक पाण्याची आवश्यकता नसून, ते अल्प कालावधीत म्हणजेच 60 ते 100 दिवसांमध्ये काढणीला येते. बाजरी उत्पादन मिळवण्यासह शेतकऱ्यांना बाजरी पिकापासून जनावरांसाठीचा चारा देखील मिळतो. हा चारा दुधाळ जनावरांसाठी अत्यंत पौष्टिक असतो. ज्यामुळे दुधाळ जनावराची धार वाढण्यास मदत होऊन, दूध उत्पादनात मोठी वाढ होते.

Gorakshnath Thakare
सकाळ, ABP माझा, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. शेती क्षेत्रात विशेष रस असून शेतमाल प्रक्रिया उद्योग, बाजारभाव, वायदेबाजार, तंत्रज्ञान आदी विषयांची आवड आहे.