Dairy Farming : गाय-म्हैस आजारी आहे? हे क्षणात ओळखा; ‘ही’ असतात 12 लक्षणे!

Dairy Farming Cow Buffalo Sick 12 Symptoms
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी दुग्ध व्यवसायासोबत (Dairy Farming) जोडले गेले आहे. दूध व्यवसाय करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यातील एक म्हणजे दुधाळ जनावर आजारी असल्यास बऱ्याच शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही. ज्यामुळे असे जनावर आपले आजारपण अंगावर काढत असते. अशा वेळी दूध उत्पादनात मोठी घट होऊन शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते. मात्र, अशी काही लक्षणे असतात की शेतकरी आपल्या दुधाळ जनावराचे (Dairy Farming) निरीक्षण करून ओळखू शकतात की ते आजारी आहे की नाही? याबाबत थोडक्यात जाणून घेऊया.

एक दूध उत्पादक शेतकरी म्हणून, शेतकऱ्यांनी नेहमी आपल्या दुधाळ जनावराकडे (Dairy Farming) बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. कारण जनावरे आपल्या आजाराबाबत बोलून सांगू शकत नाही. अशा वेळी 12 लक्षणे असतात, जी शेतकऱ्यांना आपल्या दुधाळ जनावराचे आजारपण सांगू शकतात. शेतकऱ्यांनी या 12 लक्षणाबाबत नेहमी आपल्या जनावरांवर लक्ष ठेवल्यास त्यांना दोन फायदे होतात. पहिला फायदा म्हणजे एखादे दुधाळ जनावर आजारी पडल्यास, तुम्ही त्याला इतर जनावरांपासून बाजूला बांधू शकता. ज्यामुळे तुम्हाला संबंधित आजाराचा फैलाव होण्यापासून वेळीच रोखता येईल. आणि दुसरा फायदा म्हणजे तुम्ही अशा जनावरावर तात्काळ इलाज करून, आपल्या दुधात होणारी घट थांबवू शकता. यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होणार नाही.

‘ही’ आहेत 12 लक्षणे (Dairy Farming Cow Buffalo Sick 12 Symptoms)

  • एखाद्या जनावराच्या चालण्यात, व्यवहारात आणि हावभावांमध्ये बदल दिसून येणे हे त्याच्या आजारी असण्याचे लक्षण असते.
  • एखादे दुधाळ जनावर चारा खात नसेल, रवंथ करत नसेल किंवा मग अन्य जनावरांपासून दूर एकटे राहत असेल तर ते जनावर आजारी असू शकते.
  • एखाद्या जनावराच्या दुधात अचानक घट दिसून आल्यास ते आजारी असू शकते.
  • कधी कधी काही जनावरे नेहमीपेक्षा शांत होतात. त्यांच्या अंगावरील केस सरळ उभे होतात. हे सुद्धा आजारपणाचे लक्षण आहे.
  • एखादे दुधाळ जनावर आपली मान खाली जमिनीला लावून उभे राहत असेल तर अशा जनावरांमध्ये अशक्तपणा प्रतीत होतो.
  • शक्यतो शेतकऱ्यांना नेहमी आपल्या जनावरांच्या पाठीवर हात ठेवला पाहिजे. यातून जनावरांचा ताप लक्षात येतो.
  • जनावरांच्या नाक, कान आणि डोळ्यातून पाणी येणे हे सुद्धा जनावर आजारी असल्याचे दर्शवते.
  • याशिवाय एखाद्या दुधाळ जनावराचे शेण हे खूप पातळ किंवा कडक येत असेल तर ते सुद्धा आजारी असल्याचे महत्वाचे लक्षण मानले जाते.
  • इतकेच नाही तर कधी कधी जनावरांच्या डोळ्यांना मोठी चिपाडे येतात. हे देखील आजारपणाचे लक्षण आहे.
  • जनावर आपल्या तोंडातून पांढरी लाळ गाळत असेल तर ते निश्चितपणे आजारी असते.
  • याशिवाय चालताना लंगडत-लंगडत चालत असेल तर असे जनावर आजारी असते.
  • एखादे जनावर आजारी असल्यास सर्वात मोठे लक्षण म्हणजे, त्याच्या वजनात किंचित घट दिसून येते.