हॅलो कृषी ऑनलाईन : अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला. त्यावेळो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी बटन दाबून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 19 हजार कोटींहून अधिक रक्कम जमा केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा राज्यांच्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्राचे लातूर येथील शेतकरी बाबासाहेब नराळे यांच्याशी देखील मोदींनी संवाद साधला.
देशातील दोन करोड दहा लाख शेतकरी जोडले गेलेल्या किसान क्रेडिट कार्ड KCC चे लाभार्थी बाबासाहेब नराळे हे देखील आहेत. किसान क्रेडिट कार्ड मुळे कशा पद्धतीने त्वरित कर्ज मिळाले आणि त्यातून कशा पद्धतीने शेती व्यवसाय सुरू आहे याची माहिती नराळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. यावेळी बोलताना नराळे म्हणाले, मागील वर्षापर्यंत पैसे येत नव्हते मात्र जुलैमध्ये केसीसी म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड योजनेचा स्टॉल आमच्या इथे लावला होता. तेव्हा तेथील अधिकाऱ्यांमार्फत KCC चे फायदे सांगण्यात आले. त्यावेळी 1लाख 58 हजार रुपयांचे कर्ज दोन दिवसात मंजूर झाले. हे कर्ज फेडण्याची मुदत पाच वर्षांपर्यंतची आहे. पण आत्ता कुठे एक वर्ष झाले आहे. तरी शेतीमध्ये त्याचा चांगला फायदा होऊन उत्पन्न वाढले आहे अशी माहिती निराळे यांनी दिली. या पैशातून जमिनीची लेवल केली. काही बकऱ्या घेतल्या. आधी माझ्या पाच एकर जमिनीतून 20 पोती धान्य मिळत होते. आता ते वाढून 40 पोती मिळतात अशी माहितीही नराळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली. या सोबतच मी माझ्या शेतात मिरची आणि इतर पीकही घेतो आहे अशीही माहिती त्यांनी दिली. शेवटी जाता जाता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नरवाडे यांना तुम्ही हिंदी चांगले बोलता असं म्हणत प्रशंसा केली. तर शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीमध्ये नराळे यांना काळजी घ्या! बरं आहे का मग?असे मराठी बोलत विचारनाही केली.