हॅलो कृषी ऑनलाईन: भारतात मिरचीचे वेगवेगळे प्रकार (Hottest chilly In the World) आढळतात. कमी अधिक प्रमाणात प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात वेगवेगळ्या स्वरुपात मिरचीला विशेष स्थान आहे. मिरचीशिवाय जेवण सुद्धा अपूर्ण मानणारी अनेक लोक मोठ्या चवीने रोजच्या जेवणात हिरव्या मिरचीला स्थान देतात. भारतातील वेगवेगळ्या प्रदेशात विविध जातीच्या आणि प्रकारच्या मिरच्या आढळतात. ज्यांचा तिखटपणा आणि चव सुद्धा वेगवेगळी आहे. जसे काश्मीरी लाल मिरची तिच्या लाल रंगासाठी प्रसिद्ध आहे, तर ईशान्येतील ‘भूत जोलोकिया’ (Ghost Jolokia) मिरची तिच्या जबरदस्त तिखटपणासाठी जगभरात (Hottest chilly In the World) ओळखली जाते.
जाणून घेऊ भारतातील विविध भागांतील मिरच्यांचे प्रकार आणि त्यांची खासियत
काश्मीरी मिरची (Kashmiri Chilly)
ही मिरची काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागात घेतली जात असून गडद लाल रंगासाठी ओळखले जाते. ही मिरची चवीला फारशी मसालेदार किंवा तिखट नसते. जेवणातील पदार्थांचा रंग वाढवण्यासाठी या मिरचीचा वापर केला जातो.
ईशान्येकडील भूत जोलोकिया (Ghost Jolokia)
नावाप्रमाणेच, भूत जोलोकिया मिरची अत्यंत मसालेदारपणासाठी जगभरात लोकप्रिय आहे. त्याला भूत मिरची असेही म्हणतात. ही जगातील सर्वात तिखट मिरची (Hottest chilly In the World) असून या मिरचीचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंदवले गेले आहे. अरूणाचल प्रदेश, आसाम, नागालँड आणि मणिपूरमध्ये याची लागवड केली जाते. ही मिरची मुख्यत: आंबवलेले मासे किंवा डुकराचे मांस मध्ये वापरले जाते.
गुजरातची ज्वाला मिरची (Gujarat Jwala chilly)
ज्वाला मिरची भारतीय घरांमध्ये खूप लोकप्रिय आहे. हे गुजरातच्या दक्षिणेकडील भागात घेतले जाते. ही चवीला खूप मसालेदार असून चटणी, लोणचे आणि स्वयंपाक इत्यादी मध्ये वापरली जाते.
आंध्र प्रदेशातील गुंटूर मिरची (Andhra Pradesh Guntur Chilly)
ही मिरची दक्षिण भारतीय मसालेदार अन्नाचे मुख्य घटक आहे. गुंटूर मिरचीचा वापर आता भारताच्या जवळपास सर्वच भागात केला जात आहे. शिवाय या मिरचीची जगभरात निर्यात सुद्धा होत आहे.
तामिळनाडूची मुंडू मिरची (Tamil Nadu Mundu Chilly)
आकाराने लहान आणि गोलाकार अशी ही मिरची चवीला खास आहे. या मिरचीची त्वचा पातळ असते आणि त्यात गर जास्त असतो.