Nutmeg Taffy Got Patent: गोव्याच्या ‘जायफळ टॅफी’ आविष्काराला मिळाल पेटंट! जाणून घ्या शेतकर्‍यांना होणारा फायदा  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: गोव्याच्या ‘जायफळ टॅफी’ आविष्काराला पेटंट मिळाले (Nutmeg Taffy Got Patent) असून याचा शेतकऱ्यांना (Farmers) मोठा फायदा होणार आहे. यामुळे शेतकर्‍यांना प्रत्येक झाडामागे 5,600 रुपये अतिरिक्त वार्षिक उत्पन्न मिळणार आहे. जायफळ हे भारतातील एक महत्त्वपूर्ण मसाला पीक असून, त्याची प्रामुख्याने जायफळ बी आणि गर यासाठी लागवड केली जाते.

गोव्यातील (Goa) भारतीय कृषी संशोधन परिषद – केंद्रीय तटीय कृषी संशोधन केंद्र (ICAR-CCARI) मधील डॉ. ए.आर. देसाई आणि त्यांच्या नेतृत्वा खालील चमूच्या “जायफळ टॅफी (Nutmeg Taffy) तयार करण्याची प्रक्रिया आणि त्यापासून बनवलेले  उत्पादन नावाच्या शोधाला पेटंट मिळाल आहे.

‘जायफळ टॅफी’ टिकाऊ आणि किफायतशीर उत्पादन (Nutmeg Taffy Got Patent)

जायफळ (Nutmeg) भारतातील एक महत्त्वपूर्ण मसाला पीक आहे. त्याची प्रामुख्याने जायफळ बी आणि गर यासाठी लागवड केली जाते. कापणीनंतर बहुतेक वेळा जायफळाचे बीज कोष शिल्लक राहतात.  या शिल्लक उप-उत्पादनाची दखल घेत गोव्यातील आयसीएआर – सीसीएआरआय ने जायफळ बीज कोषांचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या उद्देशाने एक उपाय विकसित केला आहे. जायफळ बीज कोष टॅफी या नाविन्यपूर्ण उत्पादनामध्ये महत्त्वपूर्ण पौष्टिक मूल्य असून ते ताज्या फळाच्या 80 ते 85 टक्के भागापासून बनते. कृत्रिम प्रिझर्वेटिव्हप्रीजार्वेतीव्ह शिवाय सुद्धा  ते सामान्य तापमानात 12 महिन्यांपर्यंत सोयीस्करपणे साठवले जाऊ शकते. यामुळे हे उत्पादन  एक टिकाऊ आणि किफायतशीर उपाय बनले आहे.

आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल (Nutmeg Taffy Got Patent)

या नव्या तंत्रज्ञानाच्या अंमल बजावणीमुळे, शेतकर्‍यांना पारंपरिक जायफळ मसाल्याच्या उत्पादनांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाव्यतिरिक्त प्रत्येक झाडामागे 5,600 रुपये अतिरिक्त वार्षिक उत्पन्न मिळणार आहे. हे उत्पादन तयार करण्याच्या प्रक्रियेचा साधेपणा, त्यासाठी अगदी थोड्या उपकरणांची आवश्यकता आणि व्यावसायिक व्यवहारता या वैशिष्ट्यांमुळे कृषी-उद्योजकता, स्वयं-सहायता गट, लघु आणि मध्यम-स्तरीय अन्न उद्योग आणि कृषी-पर्यावरण पर्यटन केंद्रांसह विविध क्षेत्रांमध्ये त्याची व्यापक अंमलबजावणी होऊ शकेल. या आविष्काराच्या तंत्रज्ञान हस्तांतरणातून गोव्यातील नेत्रावली येथील मेसर्स तनशीकर स्पाइस फार्म आणि गोवा राज्य जैवविविधता मंडळ, गोवा या संस्थांनी आधीच यशस्वी व्यापारी उत्पादन सुरू केले आहे. हे नव उत्पादन म्हणजे सामाजिक – आर्थिक विकासाच्या दृष्टीने कृषी इनोव्हेशनच्या संभाव्यतेचा उपयोग करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

गोव्यातील आयसीएआर-सीसीएआरआय च्या इन्स्टीटयूट टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट युनिटने पेटंट अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच कृषी क्षेत्रातील इनोव्हेशन आणि तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी संस्थेची बांधिलकी दर्शवली आहे (Nutmeg Taffy Got Patent).

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.