हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकर्यांच्या शेतकरी सन्मान योजनेतील (Shetkari Samman Yojana) पीक कर्जमाफी (Crop Loan Waiver) संदर्भात 15 दिवसांत निर्णय घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) नागपूर खंडपीठाने यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे (Shetkari Samman Yojana).
राज्य शासनाने (State Government) 2017 मध्ये जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनेपासून (Shetkari Samman Yojana) वंचित असलेल्या शेतकर्यांच्या पीक कर्जमाफीसंदर्भात 15 दिवसांत निर्णय घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
कर्जमाफी मंजूर होऊनही त्यापासून वंचित राहलेल्या जिल्ह्यातील 50 शेतकर्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात (Nagpur Bench) याचिका दाखल केली. यात तब्बल सात जणांना प्रतिवादी करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने यवतमाळ जिल्हाधिकारी यांना वरील आदेश दिले आहेत. या आदेशामुळे कर्ज माफीपासून वंचित राहलेल्या शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँक (District Central Bank) आणि ग्राम विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे (Executive Cooperative Societies) कर्जदार असलेल्या शेतकर्यांना 2017 मध्ये कर्जमुक्ती योजनेचा (Shetkari Samman Yojana) लाभ मिळणार, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे शेतकर्यांनी कर्जाची परतफेड केली नाही. त्यांच्या कर्ज माफीची रक्कम शासनाकडून आली. मात्र तांत्रिक त्रुटी असल्याचे सांगून त्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात आला नाही. उलट कर्ज माफीसाठी आलेली रक्कम परत गेल्याचे सांगण्यात आले. ही त्रुटी दूर करावी म्हणून शेतकर्यांनी सर्व प्रयत्न केले. शासनाकडे वारंवार विनंती केली. मात्र 2023 उजाडले तरीही शासन स्तरावर कोणीच प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्ह्यातील 50 शेतकर्यांनी एकत्र येते नागपूर उच्च न्यायालयातील अॅड. जयकुमार वानखेडे यांच्या माध्यमातून न्यायालयात याचिका दाखल केली.
या याचिकेत राज्य शासनातील सहकार विभागाचे सचिव, यवतमाळ जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी यांना प्रतिवादी करण्यात आले. हे प्रकरण न्या. अविनाश घारोटे आणि एम.एस. जवळकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणीला आले. आता न्यायालयाच्या निर्देशानंतर जिल्हाधिकारी 15 दिवसांत काय निर्णय देतात, याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे (Shetkari Samman Yojana).