हॅलो कृषी ऑनलाईन: डाळवर्गीय पीक असलेल्या उडदाचे दर (Urad Dal Rate) दिवसेंदिवस वाढतच आहेत. शनिवारी रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत (Risod Krushi Utpanna Bazar Samiti) या शेतमालास तब्बल 9 हजार 185 रुपये प्रति क्लिंटनपर्यंतचा कमाल दर मिळाला. इतरही बाजार समित्यांत उडदाला 8 हजारावर दर मिळाले. तथापि, जिल्ह्यात उडदाचे (Udid) क्षेत्रच नगण्य असल्याने बाजार समित्यांत या शेतमालाची (Urad Dal Rate) मोजकीच आवक होत आहे.
जिल्ह्यात गतवर्षी मॉन्सूनला विलंब (Delayed Monsoon Season) झाल्याने गत खरीप हंगामात शेतकर्यांनी मूग आणि उडदाच्या पेरणीकडे (Urad Sowing) पाठ केली. केवळ सहा हजार हेक्टरच्या जवळपास उडदाची पेरणी झाली होती. त्यात अतिवृष्टी आणि अवर्षणामुळे या पिकाचे नुकसानही झाले. त्यामुळे उत्पादनात अधिकच घट आली. त्यानंतर उन्हाळी हंगामात केवळ 86.70 हेक्टरवर उडदाची (Summer Urad Sowing) पेरणी झाली.
आता डाळवर्गीय पिकांना (PulsesCrops) मागणी असून, उडदाचे दर (Urad Dal Rate) दहा हजारांकडे वाटचाल करू लागले आहेत. तथापि, शेतकर्यांकडे हा शेतमालच नसल्याने या दरवाढीचा शेतकर्यांना काहीही फायदा नसून, बाजार समित्यांत या शेतामालाची अगदीच नगण्य आवक होत आहे. शनिवारी वाशीम बाजार समितीत केवळ 80 क्विंटल, रिसोड बाजार समितीत 60 क्विंटल, तर मंगरूळपीर बाजार समितीत या शेतमालाची केवळ 40 क्विंटल आवक झाली होती.
कोणत्या बाजार समितीत उडीदाला किती दर (Urad Dal Rate)
रिसोड – 9185
वाशीम – 9000
मं.पीर – 7395
सर्वच डाळवर्गीय पिके तेजीत
मागील काही दिवसांपासून बाजारात डाळवर्गीय पिकांच्या दरात प्रचंड तेजी दिसून येत आहे. तुरीचे दर 11 हजार 500 रुपये प्रति क्विंटलच्यावर आहेत, तर मुगाचे दर 8 हजार रुपये प्रति क्विंटल असून, हरभर्याचे दरही सहा हजार रुपये प्रति क्विंटलच्याही वर पोहोचले आहेत. नव्या हंगामातील पेरणीलाच अद्याप महिना भराचा वेळ असताना आणि शेतकर्यांकडे डाळवर्गीय शेतमाल नावापुरताच असल्याने या पिकांचे दर (Urad Dal Rate) आणखी वाढण्याची शक्यता आहे.