Basmati Rice Varieties: बासमती तांदळाच्या ‘या’ टॉप 5 जाती, कमी वेळेत देतात चांगल्या उत्पादनाची हमी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतात वेगवेगळ्या राज्यात खरीप भाताची (Basmati Rice Varieties) लागवड केली जाते. बासमती धानाच्या काही जाती आहेत, ज्याची खरीप हंगामात (Kharif Rice) लागवड केल्यास कमी वेळेत जास्त पीक घेता येते. शेतकर्‍यांनी या धानाची लागवड केल्यास त्यांना दुप्पट नफा मिळू शकतो. बासमती तांदूळ सुगंधी तसेच चवदार असून त्याला वर्षभर मागणी असते. जाणून  घेऊ या बासमती धानाच्या 5 सर्वोत्तम जातींबद्दल (Basmati Rice Varieties).

  • पुसा बासमती-6 (Pusa Basmati – 6)

पुसा बासमती-6 जातीच्या (Basmati Rice Varieties) धानाच्या पिकांची उंची कमी असते, त्यामुळे जोरदार वाऱ्यापासून पिकांचे संरक्षण होते. या जातीपासून मिळणारा तांदूळ हा दाण्यांसारखाच असतो. पुसा बासमती-6 धानाची लागवड करून शेतकरी हेक्टरी 55 ते 60 क्विंटल उत्पादन घेऊ शकतात.

  • कस्तुरी बासमती (Kasturi Basmati)

कस्तुरी बासमती तांदळाची जात शेतकर्‍यांमध्ये त्याच्या पौष्टिक गुणधर्मांमुळे ओळखली जाते. या बासमती धानाचे दाणे लहान आणि सुगंधीही असतात. भाताच्या या जातीची चवही चांगली लागते. बासमतीच्या या जातीला बाजारात चांगला भाव मिळतो. भाताची ही जात तयार होण्यास 120 ते 130 दिवस लागतात. कस्तुरी बासमती धानाची (Basmati Rice Varieties) लागवड केल्यास शेतकर्‍यांना हेक्टरी सुमारे 30 ते 40 क्विंटल उत्पादन मिळू शकते.

  • पुसा बासमती 1121 (Pusa Basmati – 1121)

पुसा बासमती 1121 या जातीची धानाची लागवड बागायती भागात केली जाते. या जातीची लागवड करणाऱ्या शेतकर्‍यांना त्यांच्या शेतात जास्त पाणी लागते. भाताची ही जात जास्त पाण्यात चांगले उत्पादन देते.                  पुसा बासमती 1121 धानाचे दाणे लांब व पातळ असतात. भाताची ही जात तयार होण्यासाठी सुमारे 140 ते 150 दिवस लागतात. धानाच्या या जातीपासून हेक्टरी 40 ते 50 क्विंटल उत्पादन मिळू शकते.

  • तरावडी बासमती (Tarawadi Basmati Rice)

तरावडी बासमती भाताची जातही चांगली मानली जाते. इतर धानापेक्षा हे धान पिकायला थोडा जास्त वेळ लागतो. भाताची ही जात पक्व होण्यासाठी 140 ते 160 दिवस लागतात. तरावडी बासमती धानाचे दाणे पातळ व सुगंधी असतात. या जातीची लागवड करून शेतकर्‍यांना एकरी 12 ते 15 क्विंटल उत्पादन मिळू शकते.

  • बासमती 370 (Basmati – 370)

बासमती 370 वाण (Basmati Rice Varieties) ही सर्वोत्तम वाणांपैकी एक मानला जातो. या जातीचा तांदूळ केवळ भारतातच नाही तर परदेशातही निर्यात केला जातो. बासमतीची ही जात तयार होण्यासाठी 140 ते 150 दिवस लागतात. बासमती 370 धानाचे दाणे अतिशय सुगंधी असून त्यांची लांबीही मोठी आहे. या जातीच्या धानाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना हेक्टरी 20 ते 25 क्विंटल उत्पादन मिळू शकते.

हे सुद्धा वाचा बासमती तांदळाच्या 45 अधिसूचित जाती