Dragon Chicken: लाख रूपयांची ‘ड्रॅगन कोंबडी’ कधी बघितली आहे का? जाणून घ्या विशेषता!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतात कोंबडीच्या (Dragon Chicken) अनेक जाती आहेत. वेगवेगळ्या प्रदेशानुसार या कोंबडीच्या जातींना (Poultry Breeds) नावे देण्यात आले आहे. आणि प्रत्येक जातीची वैशिष्ट्ये सुद्धा वेगवेगळी आहेत. आज आम्ही तुम्हाला कोंबडीच्या अशा जातीची (Dragon Chicken) माहिती सांगणार आहोत जी खूप प्रसिद्ध आहे फक्त चवीमुळे नाही तर तिच्या किमतीमुळे.

होय! तुम्ही बरोबर वाचलात. या कोंबडीची किंमत आहे एक लाख रुपयांपेक्षा जास्त (Expensive chicken). आणि या कोंबडीचे नाव आहे ‘ड्रॅगन कोंबडी’ (Dragon Chicken).

व्हिएतनाम (Vietnam) देशात सापडलेल्या एका ड्रॅगन कोंबडीची किंमत लाखोंमध्ये आहे. या कोंबडीच्या जातीचं नाव ‘डोंग ताओ’ (Dong Tao Chicken) असं आहे. ज्याला ड्रॅगन चिकनही म्हटले जाते. या कोंबडीला विकत घ्यायचे असेल तर त्या किमतीत आपल्याकडच्या सगळ्यात महाग कडकनाथ चिकनच्या 200 कोंबड्या खरेदी करता येईल एवढी या ड्रॅगन कोंबडीची (Dragon Chicken) किंमत आहे. जगातल्या सर्वात महागड्या कोंबड्यांमध्ये ही कोंबडी आता गणली जाऊ लागली आहे.

ही कोंबडी व्हिएतनाममध्ये (Vietnamese Chicken) जरी सापडली असली तरी याच्या वाढत्या मागणीमुळे जगभरातल्या पोल्ट्री व्यवसायिकांनी या कोंबडीचे पालन करण्यास सुरुवात केली आहे.

काय आहे विशेष या कोंबडीत?

डॉन्ग टाओ या ड्रॅगन कोंबडीचं पालन ( Poultry Farming) व्हिएतनाम देशात आधी सुरू झालं. शेताच्या एका भागात या जातीच्या काही कोंबड्या पाळल्या. या कोंबड्यांचे पाय ही सामान्य कोंबड्यांपेक्षा वेगळे आहेत काहीसा मोठा आकार आणि दिसायला तपकिरी विटेसारखे. याच खास गुणधर्मामुळे जगभरात या ड्रॅगन कोंबडीला प्रचंड मागणी असते. परदेशात नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये या कोंबडीच्या चिकनला (Chicken For New Year) सर्वाधिक मागणी असते आणि ते खूप महाग विकल्या जाते.

चरबीची मात्रा कमी

या कोंबडीत चरबीची मात्रा कमी असल्याने ड्रॅगन कोंबडीला (Dragon Chicken) खाणं लोक पसंत करत आहेत. यासोबतच या कोंबडीचं वजन इतर कोंबड्याच्या तुलनेत अधिक आहे. साधारण 10 किलोच्या चिकनमध्ये फॅटही कमी असल्याने याला मागणी वाढती आहे.

स्वादिष्ट चव

ड्रॅगन कोंबडीची चवीला स्वादिष्ट असल्याने या कोंबडीला असणारी मागणी अधिक आहे. या कोंबडीमध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर असल्याने याचे चिकन (Dragon Chicken) तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय होत आहे.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.