Bhuimug Bajar Bhav: आवक वाढल्याने भुईमुगाच्या दरात गतवर्षींपेक्षा हजार रूपयांची घसरण! जाणून घ्या आजचे दर 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: यंदा भुईमुगाचा उतारा घटला असून दरही (Bhuimug Bajar Bhav) घटल्याचे चित्र आहे. गतवर्षी सात हजार रुपये क्विंटल असलेले भुईमुगाचे दर यावर्षी साडेचार ते सहा हजार रुपये क्विंटलच्या घरात पोहोचले आहे. त्यामुळे क्विंटलमागे हजार रूपयांची घसरण नोंदविण्यात आली आहे. एकीकडे अस्मानी संकटाना तोंड देत शेतकऱ्यांनी भुईमुग पिकाचे उत्पादन घेतले. मात्र एकीकडे उत्पादन घटले असून दरही (Bhuimug Bajar Bhav) कोसळले असल्याचे दिसून येत आहे. 

रब्बी हंगामातील भुईमुग (Rabi Bhuimug) काढणीची लगबग सुरू असून अनेक भागात बाजार समित्यांमध्ये देखील भुईमुग दाखल होऊ लागला आहे. गतवर्षी भुईमुगाचे दर (Bhuimug Bajar Bhav) अधिक होते. यामुळे यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी नऊ हजार 746 हेक्टरवर शेतकऱ्यांनी भुईमुगाची लागवड केली; मात्र यावर्षी खुल्या बाजारात (Bhuimug Market) भुईमुगाचे दर कोसळले आहेत. विशेष म्हणजे सततच्या बदलत्या वातावरणाने शेतकर्‍यांच्या पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. भुईमुगाचा उतारा घटल्याने (Groundnut Production) शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.

दरम्यान भुईमुग बियाणे, खत, निंदणी आणि भुईमुग काढणीचा खर्च (Groundnut Production Cost) मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यातून भुईमुग विक्री करून मिळणारे दर शेतकऱ्यांना न परवडणारे आहेत. यातून शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. भुईमुगातून मिळणाऱ्या पैशावरच शेतकर्‍यांचे खरीपातील गणित अवलंबून आहे. याच ठिकाणी दराला मोठा फटका बसल्याने कर्जाची परतफेड करायची कशी? असा प्रश्न शेतकर्‍यांपुढे निर्माण झाला आहे. दर वाढतील या आशेने थांबले तर पुढील हंगामात पेरणी करायची कशी हा मोठा प्रश्न आहे. मिळेल त्या दरात शेतकरी भुईमुग विक्रीसाठी बाजारात येत आहे. यातूनच बाजारात गर्दी वाढली आहे. याचवेळी दर (Bhuimug Bajar Bhav) दबावात आहे. यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.

एकरी तीन क्विंटलचाही उतारा नाही

भुईमुगाचे पीक मेहनतीला न परवडणारे आहे. यात भुईमुग काढणीसाठी मजूरही मिळत नाहीत. यामुळे शेतकरी अधिकच धास्तावले आहे. शेतमालास किमान चांगले दर मिळाले तरी पावले. सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे. तर काही शेतकरी सांगत आहेत की यावर्षी शेतकऱ्यांना एकरी तीन क्विंटलचाही उतारा आला नाही. सोबत भुईमुग काढणीचा (Groundnut Harvesting Expenses) खर्चही अधिक आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेत शेतकऱ्यांना सर्वाधिक मेहनत घ्यावी लागते. हातात पैसे उतरच नाही. गतवर्षीइतकेच दर अपेक्षित होते.

आजचे भुईमुगाचे दर (Bhuimug Bajar Bhav)

आज छत्रपती संभाजी नगर बाजार समितीमध्ये भुईमुगाच्या सुक्या शेंगांना 4,150 रुपये तर कारंजा बाजार समितीत 5,830 रुपये, तर अमरावती बाजार समितीत लोकल शेंगांना 6,025 रुपये दर मिळाला.

भुईमुगाच्या आल्या शेंगांना भुसावळ बाजार समितीत 5,000 रुपये तर राहता बाजार समितीत 4,200 रुपये दर मिळाला.

त्यामुळे मागील वर्षी सरासरी 6,500 ते 7,000 रूपयांपर्यंत दर मिळाला होता. मात्र यंदा या दर (Bhuimug Bajar Bhav) 6,000 रूपयांच्या खाली असल्याचे दिसून येत आहे.