Bhuimug Market Rate: हिंगोली मार्केटमध्ये वाढली भुईमुगाची आवक! काय मिळतोय भाव?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या भुईमुगाला चांगले बाजारभाव (Bhuimug Market Rate) मिळत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी भुईमुग बाजारात आणत आहेत. हिंगोली येथील बाजार समितीच्या (Hingoli Bajar Samiti) मोंढ्यात मागील चार दिवसांपासून भुईमुगाची आवक वाढली असून, 23 मे रोजी जवळपास दीड हजार क्विंटल भुईमूग शेंगा विक्रीसाठी आल्या होत्या. 5 हजार ते 6 हजार 300 रूपयां दरम्यान भाव (Bhuimug Market Rate) मिळाला.

जिल्ह्यातील बहुतांश भागातील भुईमूग काढणीचे (Groundnut Harvesting) काम आटोपले आहे. सध्या समाधानकारक भाव (Groundnut Market Rate) मिळत असल्याने बहुतांश शेतकरी भुईमूग विक्रीसाठी आणत आहेत. मागील पंधरवड्यापासून आवक वाढत असून, सध्या सरासरी एक ते दीड हजार क्विंटल शेंगा विक्रीसाठी येत आहेत.

आवक (Bhuimug Market Rate) वाढल्याने मोंढ्याच्या शेडची जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांचा भुईमूग शेड बाहेर रस्त्यावर टाकावा लागत आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना प्रखर उन्हात रस्त्यावर बसून शेतमालाची राखण करावी लागत आहे.

शेतकर्‍यांना उन्हात बसून करावी लागत आहे भुईमुगाची राखण

सध्या राज्यात तापमानात वाढ होतांना दिसत आहे. अशावेळी शेतकर्‍यांना माल विक्रीला (Bhuimug Market Rate) आणताना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. मोंढ्यात भुईमुगाची आवक वाढली आहे. त्यातच शेडमध्ये व्यापार्‍यांच्या मालाच्या थप्प्यांनी बरीच जागा व्यापली आहे. परिणामी, शेतकर्‍यांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल टाकण्यासाठी जागाच शिल्लक राहत नाही. त्यामुळे शेतमाल रस्त्यावर पडत असल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. त्यातच रस्त्यावर पडलेल्या शेतमालाची राखण करताना शेतकर्‍यांना प्रखर ऊनही डोक्यावर घ्यावे लागत आहे. त्यामुळे नाराजीचा सूर उमटत आहे.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.