हॅलो कृषी ऑनलाईन: लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील एका शेतकऱ्याने (Farmers Success Story) तीन एकर केशर आंब्याच्या बागेतून तब्बल 3 लाखांचे उत्पन्न मिळवलं आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने ‘बजरंग’ (Bajrang Mango) नावाची आंब्याची एक नवीन जात (New Mango Variety) विकसित केली आहे.
मराठवाड्यासाठी दुष्काळ हा पाचवीला पुजलेला आहे. दुष्काळी भागात तर शेती करणे शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक आहे. परंतु लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील एका शेतकऱ्याने तीन एकर केशर आंब्याच्या बागेतून (Kesar Mango Farming) तब्बल 3 लाखांचे उत्पन्न मिळवलं आहे. विशेष म्हणजे या शेतकर्याने बजरंग नावाची आंब्याची एक नवीन जात विकसित केली आहे. या शेतकऱ्याचे नाव आहे विठ्ठल चांभरगे (Farmers Success Story).
‘बजरंग’ आंब्याचे वैशिष्ट्ये
या आंब्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा आंबा तब्बल 800 ते 1000 ग्रॅम वजनापर्यंत होऊ शकतो. चवीला अतिशय गोड आणि रुचकर असलेला हा आंबा ग्राहकांमध्ये लोकप्रिय होत आहे. संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने बागेची निगा राखल्याने आणि नैसर्गिक पद्धतीने आंबे पिकवल्याने (Natural Ripe Mango) या आंब्यांना मोठी मागणी देखील आहे.
विठ्ठल चांभरगे यांनी आपल्या शेतात 3 एकर शेतीत 600 आंब्यांची लागवड (Mango Farming) केली आहे. यामध्ये त्यांच्या बजरंग आंब्याला जिल्ह्यातून सर्वात जास्त मागणी होते. बाजार उपलब्ध असलेल्या आंब्यांपेक्षा 5 पट जास्त गोड, आकाराने मोठे, पूर्ण निरोगी आणि पोषक मुलद्रव्यांनी युक्त असे हे आंबे बाजारातील एक्सपोर्ट क़्वालिटीच्या आंब्यांपेक्षा पेक्षा कित्येक पट्टीने दर्जेदार आणि उत्तम आहेत, अशी माहिती विठ्ठल चांभरगे यांनी दिली.
सेंद्रिय पद्धतीने फुलवली आंब्याची बाग (Farmers Success Story)
लागवडीपासून आजपर्यंत बागेमध्ये कुठल्याही स्वरुपाच्या रासायनिक खताचा वापर न करता केवळ सेंद्रिय पद्धतीने (Organic Mango Farming) बाग फुलविण्यात आली आहे. विषमुक्त शेती ही आजच्या काळाची गरज असल्याचे ओळखून सेंद्रिय पद्धतीने फवारणी खत तसेच सर्व हे नैसर्गिक पद्धतीचे वापरल्यामुळे बाजारात या आंब्याला मागणी जास्त मिळत आहे. बजरंग नावाचा आंबा एक किलोचा होतो, असंही विठ्ठल चांभरगे यांनी सांगितले.
पहिल्याच काढणीत 3 लाखांचे उत्पन्न
पाच वर्षांपूर्वी लागवड केलेल्या केशर आंब्याचे उत्पादन यावर्षी आत्तापर्यंत 5 ते 6 टन मिळाले आहे. आणि अजून झाडाला काही आंबा शिल्लक आहे. रासायनिक पद्धतीने आंबा न पिकवता पारंपारिक पद्धतीने आंबा पिकवून विकल्याने याची मागणी ग्राहकांमध्ये जास्त आहे. या आंब्याच्या विक्रीतून आतापर्यंत 3 लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे (Farmers Success Story). अजून मोठ्या प्रमाणात आंबा शिल्लक आहे.
तरुण शेतकऱ्यांनी फळबागेच्या शेतीकडे वळावे
मराठवाडा हा भाग पर्जन्यमानाच्या अनियमिततेने पाण्याची कमतरता इथे सतत जाणवते. यामुळे पारंपरिक शेतीऐवजी तरुण शेतकऱ्यांनी फळबागेची निवड करावी. यामध्ये आंबा, चिंच, पेरू, अंजीर, ड्रॅगन फ्रुट या पद्धतीची शेती करून त्यातून मिळणारे उत्पादन आणि उत्पन्न हे दोन्ही परवडणारे आहे. यामुळे शेतकऱ्यांनी फळबागेची निवड करावी असा सल्ला चांभरगे यांनी दिला आहे (Farmers Success Story).