हॅलो कृषी ऑनलाईन: पशुपालन व्यवसायामध्ये जनावरांना (Animal Care) देखील विविध प्रकारच्या समस्या निर्माण होतात. यातील काही समस्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून तर काही प्रजननाच्या वेळी निर्माण होतात (Cattle Calving Problems). प्रजननाच्या संबंधित समस्या जनावरांना उद्भवल्या तर त्याचा थेट परिणाम हा पशुपालनाच्या आर्थिक गणितावर होतो. जनावरांमध्ये व्यायल्यानंतर वार अडकणे (Umbilical Cord Stuck) ही एक सर्वसामान्यपणे आढळणारी समस्या आहे. यावेळी जनावरांची काळजी (Animal Care) घेणे गरजेचे असते.
जनावर व्यायल्यानंतर (Animal Calving) जार हा सहा ते सात तासाच्या आत पडणे आवश्यक असते. बर्याचदा तसे न होता त्याला वेळ लागतो. याची बरेच कारणे आहेत. वार म्हणजे जार हा एक गर्भाशयात तयार होणारा तात्पुरता अवयव असून वासराचा जन्म झाल्यानंतर शरीराकडून वासरास होणारा रक्तप्रवाह बंद झाल्यामुळे त्याच्या पेशी निर्जीव होतात व पाण्याचा अंश कमी झाल्याने वार आकुंचन पावते. यामुळे तिचा गर्भाशयाची संपर्क तुटतो व ती लांब होते. परंतु बऱ्याचदा ती अडकते. वार अडकण्याच्या कारणे आणि त्यावर घरगुती उपाय (Animal Care) जाणून घेऊ या.
वार अडकण्याची प्रमुख कारणे (Cattle Pregnancy Care)
- जनावरांमध्ये असलेल्या अनुवंशिकतेमुळे वार पडू शकत नाही.
- प्रथमतः प्रसूत होणारी जनावरे व वय झालेली जनावरे
- गाभण काळ पूर्ण होण्याआधीच प्रसूती झाल्यास वार अडकू शकते.
- नर वासरू असल्यास वार अडकू शकते.
- व्यायला आलेली गाय किंवा म्हैस जास्त अंतर चालवत नेल्यास, योग्य प्रमाणात व्यायाम न दिल्यास वार अडकू शकते.
- जनावरांमध्ये असलेले संप्रेरकांचे कमी प्रमाण वार अडकणे मागे प्रमुख कारण आहे.
- कॅल्शियम, फास्फोरस, आयोडीन सारख्या खनिज द्रव्यांची कमतरता.
- जीवनसत्व अ किंवा कॅरोटीन व जीवनसत्व ब सारख्या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे वार अडकू शकते. हे प्रमाण लठ्ठ गाईंमध्ये जास्त प्रमाणात दिसते.
- गर्भाशयाची आकुंचन व प्रसरण पावण्याची (Animal Uterine Contraction And Dilatation) क्रिया कमी होणे.
- एखाद्या वेळेस विषबाधा, ॲलर्जी झाली तरी वार अडकू शकते.
- जनावरांनी बुरशीजन्य खाद्य खाल्ले तरी त्याचा परिणाम वार अडकण्यामध्ये मध्ये होतो.
- शस्त्रक्रिया करून वासरू काढल्यास वार अडकून राहण्याची शक्यता वाढते.
- गर्भाशयात पीळ पडल्यामुळे वार अडकण्याची समस्या निर्माण होते.
वार अडकू नये म्हणून काय करता येईल (Animal Care)
जनावरांमध्ये वार अडकू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून व्यायला आलेल्या गाई, म्हशी दररोज तासभर मोकळे सोडाव्यात त्यांना कमीत कमी एक किलो मीटर चालवत न्यावेत. तसेच तज्ञ पशुवैद्यकांच्या सल्ल्याने व्यायला आलेल्या जनावरांची काळजी घ्यावी.
नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डने सुचविलेले नैसर्गिक घरगुती उपाय (Animal Care)
- जनावर विल्यानंतर दोन तासाच्या आत जनावरांना एक मुळा खाऊ घालावा.
- समजा जनावर व्यायलास आठ तास झाले तरी जार पडला नसेल तर दीड किलो भेंडीचे दोन भागात काप करावेत व गूळ व मिठासोबत जनावराला खाऊ घालावे.
- जनावर व्यायल्यानंतर बारा तास उलटून देखील जार पडला नसेल तर जार अर्थात वाराच्या मुळाशी गाठ बांधून गाठी पासून तीन इंच खालून वार कापावा. गाठ योनिमार्ग पर्यंत परत जाते.
- हाताने वार काढण्याचा प्रयत्न करू नये. जनावर व्यायल्यानंतर चार आठवडे होईपर्यंत एक मुळा प्रत्येक आठवड्याला खाऊ घालावा.