Chilli Variety: हिरव्या मिरचीचे ‘हे’ 5 सुधारित वाण देतील तुम्हाला भरघोस उत्पन्न!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी बंधुंनो, तुम्ही जर खरीप हंगामात मिरची (Chilli Variety) पिकाची लागवड करायच्या विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला मिरचीच्या अशा जातींची माहिती देणार आहोत ज्या जून महिन्यात लागवडीसाठी अगदी योग्य आहेत शिवाय त्यापासून उत्पादन सुद्धा भरघोस मिळते. जाणून घेऊ या मिरचीच्या या जातींची (Chilli Variety) वैशिष्ट्ये.

  • पुसा ज्वाला (Pusa Jwala Chilli)

पुसा ज्वाला ही हिरव्या मिरचीच्या सर्वात प्रगत जातींपैकी (Chilli Variety) एक आहे. मिरचीची ही जात कीड  आणि कीटकांना प्रतिरोधक आहे. हिरव्या मिरचीच्या या जातीची लागवड करून शेतकरी सुमारे 34 क्विंटल प्रति एकर उत्पादन मिळवू शकतात. हिरव्या मिरचीची ही जात पेरणीनंतर सुमारे 130 ते 150 दिवसांत पिकते. मिरचीच्या या जातीचा रंग हलका हिरवा असून त्याची झाडे कमी उंचीची आणि झुडूपासारखी असतात.

  • जवाहर मिर्च-148 (Jawahar 148 Chilli)

हिरवी जवाहर मिरची-148 या सुधारित जातीची (Chilli Variety) जून महिन्यात लागवड करणे शेतकर्‍यांसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. या जातीची मिरची सर्वात जलद पिकते आणि तिची चव कमी तिखट असते. मिरचीच्या

या जातीच्या हिरव्या मिरचीचे प्रति हेक्टरी उत्पादन 85 ते 100 क्विंटल एवढे मिळू शकते. जर ही मिरची वाळल्यावर तोडली तर हेक्टरी 18 ते 25 क्विंटल मिरचीचे उत्पादन मिळू शकते.

  • तेजस्विनी (Tejaswini Chilli)

हिरव्या मिरचीची तेजस्विनी  जात (Chilli Variety) जून महिन्यात लागवडीसाठी सर्वोत्तम मानली जाते. हिरव्या मिरचीच्या या जातीच्या शेंगा मध्यम आकाराच्या असतात आणि मिरचीची लांबी सुमारे 10 सेंटीमीटरपर्यंत पोहोचते. पेरणीनंतर सुमारे 70 ते 75 दिवसांनी शेतकरी या प्रकारच्या हिरव्या मिरचीची काढणी करू शकतात. तेजस्विनी  जातीच्या हिरवी मिरचीची लागवड केल्यास शेतकर्‍यांना हेक्टरी 200 ते 250 क्विंटल उत्पादन मिळू शकते.

  • पंजाब रेड (Punjab Red Chilli)

पंजाब रेड वाण ही हिरव्या मिरचीच्या सुधारित जातींपैकी (Chilli Variety) एक आहे. तिच्या झाडाचा आकार लहान आहे आणि तिला गडद हिरवी पाने आहेत. या प्रकारच्या हिरव्या मिरचीचा आकारही फार मोठा नसतो. या जातीची लागवड करून शेतकर्‍यांना प्रति हेक्टरी 100 ते 120 क्विंटल हिरव्या मिरचीचे उत्पादन मिळू शकते. हिरव्या मिरचीच्या या प्रकारात तुम्हाला लाल रंगाच्या मिरच्या पाहायला मिळतात.

  • काशी अर्ली (Kashi Early Chilli)

काशी अर्ली या हिरव्या मिरचीच्या जातीपासून (Chilli Variety) शेतकर्‍यांना भरघोस उत्पादन मिळते. या जातीची हिरवी मिरची एक हेक्टर मध्ये सुमारे 300 ते 350 क्विंटल उत्पादन देते. या जातीच्या मिरचीचे रोप सुमारे 70 ते 75 सेमी उंच असून त्यांना लहान गाठी असतात. पेरणीनंतर सुमारे 45 दिवसांत शेतकरी काशी अर्ली या हिरव्या मिरचीची कापणी करू शकतात.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.