Milk Price: खाजगी संघाकडून दुधाच्या दरात कपातीच्या पार्श्वभूमीवर, दूध उत्पादक संघटना आक्रमक!   

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: उन्हाळ्यात दूध उत्पादनात घट आणि वाढत्या मागणीमुळे दर (Milk Price) वाढण्याची अपेक्षा असतानाच खाजगी दूध संघांनी (Private Milk Unions) एक रुपया प्रति लीटर दरात कपात केल्याने राज्यातील दूध उत्पादक शेतकर्‍यांमध्ये (Dairy Farmers) संतापाची लाट निर्माण झाली आहे. आधीच दुष्काळ आणि चारा-पाण्याच्या टंचाईमुळे (Fodder Shortage) त्रस्त असलेल्या शेतकर्‍यांवर ही दुधाच्या किमतीत (Milk Price) कपात म्हणजे दुष्काळात तेरावा महिना.

यंदाच्या दुष्काळामुळे चारा आणि पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे दूध उत्पादनात घट झाली आहे. याबरोबर, जनावरांना होणार्‍या आजारांमुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. या परिस्थितीत खाजगी दूध संघांनी केलेली दरातील कपात (Milk Price) शेतकर्‍यांसाठी आघातच आहे.

दूध अनुदान अटींच्या विळख्यात

राज्य सरकारने (State Government) 5 रुपये प्रति लीटर अनुदान (Milk Subsidy) देण्याची घोषणा केली असली तरी, अटींमुळे अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहले आहेत. वेळेवर माहिती अपलोड न केल्याने अनेक शेतकर्‍यांना अनुदानाचा लाभ मिळू शकला नाही.

दूध उत्पादक संघटनांचा आक्रमक पवित्रा

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक डॉ. अजित नवले यांनी खाजगी दूध संघांच्या मनमानी कारभारावर तीव्र टीका केली आहे. त्यांनी तात्काळ दरात वाढ (Milk Price) करण्याची आणि 5 रुपये प्रति लीटर अनुदानात अडथळे दूर करण्याची मागणी केली आहे. अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

सरकारकडून त्वरित हस्तक्षेप आवश्यक

दुष्काळ आणि वाढत्या खर्चामुळे आधीच अडचणीत असलेल्या दूध उत्पादक शेतकर्‍यांना दरातील कपामुळे मोठा फटका बसला आहे. या गंभीर परिस्थितीत राज्य सरकारने त्वरित हस्तक्षेप करून शेतकर्‍यांना मदत करणे गरजेचे आहे. दूध उत्पादनाचा व्यवसाय टिकून राहण्यासाठी आणि शेतकर्‍यांना योग्य भाव मिळण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.