भारतातील शेतीमधून हिटलर तांदूळ उत्पादित होणार, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकार ?

rice
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : संपूर्ण देशात सध्या शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. देशातील बहुतांशी शेतकरी हे तांदळाचं पीक घेतात. राज्यात पावसाचा आगमन झालं आहे. देशातील विविध भागात शेतकऱ्यांकडून भात लागवडीची तयारी सुरू झाली आहे. देशात अनेक प्रकारचा तांदूळ उत्पादित केला जातो. मात्र हिटलर 711 ही हैदराबादेतील कंपनीने तयार केलेले तांदळाचे संकरित वाण सध्या चर्चेत आहे. उत्तर प्रदेश बिहार या राज्यातील शेतकऱ्यांनी देखील हिटलर 711 या संकरित वाणाची लागवड तयारी सुरू केली आहे.

काय आहेत या तांदुळाची वैशिष्ट्ये

हिटलर 711 चा तांदूळ पीक 125 ते 130 दिवसांमध्ये तयार होतं. यापासून प्रति एकरी 18 क्विंटल उत्पादन होते असं सांगण्यात आले आहे. हिटलर तांदूळ पातळ असून चविष्ट आहे. हिटलर 711 संकरित वाण भारतीय देशी तांदळासारखा चविष्ट आहेत असा दावा देखील करण्यात आला आहे. रोपांची उंची ही 190 सेंटीमीटर पर्यंत जाते.

दरम्यान जगभरात तांदळाचे एकूण एक लाखापेक्षा अधिक वाण आहेत. भारतामध्ये 60,000 प्रकारचा तांदूळ उत्पादित केला जातो. भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश असून निर्यातदार देखील आहे. मात्र प्रति हेक्‍टरी उत्पादनात आपण जगामध्ये मागे आहोत. जागतिक पातळीवर प्रति हेक्‍टर 4546 किलो तांदळाचे उत्पादन केले जाते. तर भारतामध्ये 3576 किलो तांदूळ प्रति हेक्‍टरी मिळते. भारतात खरीप आणि रब्बी हंगामात तांदूळ पीक घेतले जाते. खरिपाच्या तुलनेत रब्बी हंगामात तांदळाचे उत्पादन कमी आहे. 2020- 21 च्या आर्थिक वर्षामध्ये भारतात 121.46 दशलक्ष तांदळाचे उत्पादन झाले आहे. पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश पंजाब हरियाणा तेलंगणा छत्तीसगड बिहार या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं.