Stand Up India Scheme: अनुसूचित जाती, जमातीच्या महिलांना व्यवसायासाठी कर्ज देणारी ‘स्टँड-अप इंडिया योजना’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: केंद्र सरकार (Stand Up India Scheme) देशातील अनुसूचित जाती, जमाती आणि महिलांना आर्थिक सहाय्य देणार्‍या नवनवीन योजना (Government Schemes) आणत असते. अशीच एक नवीन योजना शासनाने आणलेली आहे ती म्हणजे स्टँड-अप इंडिया योजना (Stand Up India Scheme).

ही योजना व्यवसाय करू इच्छिणाऱ्या SC, ST नागरिकांना आणि महिलांना प्रोत्साहन आणि पाठिंबा देण्यासाठी राबवण्यात येत आहे. जेणेकरून ते स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरू करू शकतील (Women Entrepreneurs) . व्यवसाय सुरू करताना कर्ज मिळण्यात येणार्‍या अडचणी आणि नागरिकांना होणारा त्रास या सर्व गोष्टींचा विचार करून ही योजना सोप्या पद्धतीने सुरू केली आहे. योजने अंतर्गत लाभार्थ्यांना 10 लाख ते 1 कोटी पर्यंत व्यवसायासाठी कर्ज (Business Loan For Women) मिळू शकते. जाणून घेऊ या योजनेविषयी सविस्तर माहिती.

स्टँड-अप इंडिया 2024 योजनेची वैशिष्ट्ये (Stand Up India Scheme)

  • भारत सरकारची ही योजना Loan Scheme SC/ST आणि महिला उद्योजकांना वित्तपुरवठा करण्यासाठी राबवण्यात येत आहे.
  • SC/ST/ आणि महिला उद्योजकांना उत्पादन, व्यापार किंवा सेवा उद्योगात नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 लाख ते 1 कोटी पर्यंत संमिश्र कर्ज ऑपरेटिंग भांडवलासह मिळू शकते.
  • या योजने अंतर्गत मुदत कर्ज आणि खेळते भांडवल यासह प्रकल्प खर्चाच्या 85% संमिश्र कर्ज प्रदान केले जाईल.
  • व्याज दर हा त्या श्रेणीसाठी बँकेचा सर्वात कमी लागू दर असेल (बेस रेट) पेक्षा जास्त नसावा (MCLR)+ 3% + मुदत प्रिमियम
  • प्राथमिक सुरक्षे व्यतिरिक्त बँकेने ठरविल्यानुसार स्टँड-अप इंडिया लोनसाठी (CGFSIL) क्रेडिट गॅरंटी फंड स्कीमच्या हमीद्वारे देखील कर्ज सुरक्षित केले जाऊ शकते.
  • हे कर्ज 7 वर्षांच्या कालावधीत 18 महिन्यांच्या कमाल स्थगिती कालावधीसह परतफेड करण्यात यावे.

स्टँड-अप इंडिया (Stand Up India Scheme) योजनेचे फायदे (Benefits)

  • केंद्र सरकारच्या स्टँड-अप इंडिया योजनेमुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
  • या योजने अंतर्गत व्यवसाय सुरू केल्यानंतर कर्ज परतफेड कालावधी हा 7 वर्षाचा ठेवण्यात आला आहे.
  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबुद्ध घटकातील उद्योजकांना आणि महिलांना या योजने अंतर्गत उद्योग व्यवसाय सुरू करून स्वत: सक्षम बनून इतरांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देता येईल.
  • क्रेडिट काढण्यासाठी RuPay डेबिट कार्ड दिले जाईल.
  • मार्जिन मनी योजने अंतर्गत पात्र उद्योजकांनी 10% स्व हिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजने अंतर्गत 75% कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित 15% सबसिडी राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे.
  • या योजने अंतर्गत सुरू करण्यात येणार्‍या नव उद्योग व्यवसायांना 3 वर्षा पर्यंतची इन्कम टॅक्सची सूट देण्यात येणार आहे.

स्टँड अप इंडिया योजना (Stand Up India Scheme) पात्रता निकष

  • अर्जदार हा भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार उद्योजक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नवबुद्ध प्रवर्गातील व्यक्ती किंवा महिला असावी.
  • अर्जदाराचे वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराने बँक किंवा इतर कोणत्याही संस्थेचा डिफॉल्टर नसावा.
  • गैर-वैयक्तिक एंटरप्राइझच्या बाबतीत 51% शेअर होल्डिंग आणि कंट्रोलिंग स्टेक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, किंवा महिला उद्योजकांकडे असावा.
  • कंपनी प्रायव्हेट लिमिटेड/एलएलपी किंवा भागीदारी फर्म असणे आवश्यक आहे.
  • योजनेंतर्गत फक्त ग्रीनफिल्ड प्रकल्पासाठी कर्ज दिले जाईल म्हणजे असा व्यवसाय जो उत्पादन किंवा सेवा क्षेत्रात उद्योजकाने प्रथमच सुरू केला आहे.

स्टँड अप इंडिया योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधारकार्ड
  • पॅनकार्ड
  • वयाचा पुरावा
  • जातीचा दाखला (महिलांसाठी आवश्यक नाही)
  • कंपनी/भागीदारीचे मेमोरँडम आणि पार्टनरशिप डीड्स
  • उद्योग आधार नोंदणी प्रमाणपत्र
  • जर व्यावसायिकाने जागा भाड्याने घेतली असेल तर भाड्याचं अहवाल (भाडे करार)
  • आयकर रिटर्न प्रत
  • प्रकल्प अहवाल
  • वापरलेला कच्चा माल आणि त्यांचे पुरवठादार यांचे तपशील
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • मोबाईल नंबर

स्टँड-अप इंडिया योजना अर्ज प्रक्रिया (Stand Up India Scheme)

  • सर्व प्रथम तुम्हाला योजनेच्या https://www.standupmitra.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • यानंतर होमपेजवर तुम्हाला Login या पर्यायावर क्लिक करावे लागेल, तुम्हाला या योजनेसाठी सर्वप्रथम नोंदणी करावी लागेल.
  • नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला ”हँडहोल्डिंग सपोर्टसाठी” क्लिक करा या पर्यायावर क्लिक करावे लागेल किंवा Apply for a lone या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर नोंदणी फॉर्म तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल येथे तुम्ही तीन श्रेणींमध्ये अर्ज करू शकता 1) New Entrepreneur 2) Existing Entrepreneur 3) Self Employed Professional या श्रेणी पैकी तुम्हाला ज्या श्रेणीत अर्ज करायचा आहे ती श्रेणी निवडा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव ईमेल आयडी, मोबाईल नंबर इतर माहिती टाकावी लागेल.
  • त्यानंतर जनरेट OTP वर क्लिक करावे लागेल. OTP जनरेट झाल्यानंतर तुम्हाला रजिस्टर वर क्लिक करावे लागेल.
  • आता स्टँड अप इंडिया लोन स्कीम या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमच्यासमोरील अर्जामध्ये आवश्यक तपशील प्रविष्ट करावे लागतील.
  • योजनेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • त्यानंतर सबमिटवर क्लिक करा.
  • अशा प्रकारे तुम्ही स्टँड अप इंडिया कर्ज योजने अंतर्गत ऑनलाईन अर्ज करू शकता.

स्टँड-अप इंडिया योजनेच्या (Stand Up India Scheme) अधिक माहितीसाठी खाली संपर्क करा  

अधिकृत वेबसाईट:  https://www.standupmitra.in

ईमेल आयडी : [email protected] किंवा [email protected]

राष्ट्रीय हेल्पलाइन टोल फ्री नंबर :  1800-180-1111

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.