Paddy Rate: धान उत्पादक शेतकर्‍यांचे गणित बिघडलं! धानाला काय मिळतोय भाव?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: उत्पादनात झालेली घट पाहता यंदा धानाला (Paddy Rate) प्रति क्विंटल किमान 2400 रुपये भाव मिळणे अपेक्षित होते.

वाढलेला लागवड खर्च आणि उत्पादनात झालेली घट पाहता यंदा धानाला (Paddy) प्रति क्विंटल किमान 2400 रुपये भाव (Paddy Rate) मिळणे अपेक्षित होते. मात्र, सरकारी दर 2183 रुपये असल्याने खासगी व्यापार्‍यांकडे दर (Paddy Rate) वाढतील, म्हणून अनेक शेतकर्‍यांनी (Farmers) घरात धान राखून ठेवले आहे.

नगदी पीक (Cash Crop) म्हणून भंडारा (Bhandara) जिल्ह्यात शेतकरी धानाकडे पाहतात. खरीपात (Kharif Crop) इतर पिकांच्या तुलनेत सर्वाधिक लागवड क्षेत्र धान पिकांचे असते. यावर्षी जवळपास 70 टक्केच शेतकर्‍यांनी धान पिकाचा पेरा केला होता. परंतु, अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) लहरीपणा, किडीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात प्रचंड घट झाली. अशा परिस्थितीत किमान 2400 रुपये इतके भाव मिळणे अपेक्षित होते, परिणामी शेतकर्‍यांचा धान उत्पन्नातून (Paddy Yield) लागवड खर्चही भरून निघाला नाही. अनेक शेतकर्‍यांनी भाव (Paddy Rate) वाढीच्या प्रतीक्षेत मागील दोन महिन्यांपासून विक्रीविना धान ठेवले आहे. परंतु, भाव वाढत नसल्याने शेतकर्‍यांच्या पदरी निराशा पडत आहे. 

काय आहेत सध्या धानाचे भाव? 
धान भरडाई सुरू झाल्यास धानाचे दर (Paddy Rate) वाढू शकतात. गेल्या तीन महिन्यांपासून राइस मिलर्स (Rice Millers) व राज्य सरकारमध्ये (State Government) धान वाहतूक व भरडाईच्या दरावरून वाटाघाटी सुरू आहेत. सद्यस्थितीत खासगी व्यापार्‍यांकडून 2150 ते 2250 रुपये दर मिळत आहे. तर धानाला प्रति क्विंटलचा हमीभाव 2183 रुपये असा आहे. आजच्या बाजार अहवालानुसार बाजारभाव पाहीले असता धानाला गडचिरोली बाजार समिती जय श्रीराम वाणाला क्विंटलमागे 2500 रूपयांचा सरासरी दर मिळाला. त्यानंतर आर्मी देसाईगंज बाजार समितीत क्रांती धानाला सरासरी 2238 तर लांबोर एफ ए क्यू वाणाला 2005 रुपयांचा दर मिळाला.

दीड महिना उशिराने धान खरेदी
खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाची उचल मिलर्सने केली नाही. परिणामी रबीतील धान खरेदी यंदा तब्बल दीड महिना उशिराने सुरू झाली. त्यामुळे बऱ्याच शेतकर्‍यांना गरजेपोटी अल्प दराने धानाची विक्री करावी लागली. आज ना उद्या धानाचे भाव वाढतील, या आशेवर शेतकर्‍यांनी तब्बल दोन महिने धान विक्रीविना आपल्या घरी ठेवले. मात्र, अजूनही भाव (Paddy Rate) कमीच आहेत. आता पेरणीचे दिवस जवळ येऊ लागल्याने मिळेल त्या भावात शेतकरी धान विक्री करीत आहेत.

सध्याच्या भावानुसार लागवड व मशागतीचा खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे शेती व्यवसाय तोट्याचा ठरत आहे, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

नगदी पीक म्हणून धानाकडे पाहीले जाते. परंतु, मागील दोन वर्षांत उत्पादनात घट आणि पडत्या भावामुळे धान पिकाची लागवड करणे परवडत नाही. शासनाने हमीभावात वाढ करणे आवश्यक आहे.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.