हॅलो कृषी ऑनलाईन: पावसाळ्यात जनावरे अनेक संसर्गजन्य आजाराला (Diseases Of Cattle In Rainy Season) बळी पडतात. हे टाळण्यासाठी या काळात जनावरांची योग्य काळजी घ्यावी लागते. जाणून घेऊ या पावसाळ्यात जनावरांमध्ये आढळणाऱ्या समस्या (Diseases Of Cattle In Rainy Season) आणि त्यावर उपाय.
पावसाळ्यात जनावरांमध्ये आढळणारे आजार आणि समस्या (Diseases Of Cattle In Rainy Season)
पोट फुगणे: हिरवा व कोवळा चारा जास्त प्रमाणात खाल्याने जनावरांना हा त्रास होतो. यामुळे पोटात गॅस तयार होतो. पोटाकडची डावी बाजू फुग्यासारखी दिसते. फुगलेल्या पोटाचे वजन हृदयावर व फुफ्फुसावर पडल्याने जनावर दगावण्याची शक्यता असते.
उपाय
- पोटफुगी (Diseases Of Cattle In Rainy Season) टाळण्याकरिता जनावरांना हिरव्या चाऱ्याबरोबर दोन ते तीन किलो सुका चारा खायला द्यावा.
- जनावरांना दिवसभर चरायला सोडू नये. कारण जनावर दिवसभर कोवळे गवत खाते.
- पावसाळ्यात पशु वैद्यकाच्या सल्ल्यानुसार पोटफुगीवर औषधे आणून ठेवावीत. जेणेकरून जनावरावर वेळीच उपचार करता येतील.
- पोटफुगी आजारावर प्रथमोपचार (Preventive Measures Of Cattle Diseases) म्हणून अर्धा लिटर गोडे तेलात 30 मि.लि. टर्पेंटाईन, 100 ग्रॅम सोडा व 5 ग्रॅम हिंग मिसळून आजारी जनावराला ठसका न लागता हळूहळू पाजावे.
खुरातील जखमा: पावसाळ्यात जनावरांचे पाय सतत पाण्यात राहिल्यामुळे किंवा त्यात चिखल गेल्यामुळे खुरांमध्ये जखमा (Diseases Of Cattle In Rainy Season) होतात. सतत ओलावा राहिल्यामुळे अशा जखमा चिघळून त्यावर माशा बसतात आणि जखमेत किडे पडतात. असे झाल्याने जनावरांच्या पायांना वेदना होतात, जनावर लंगडते. परिणामी जनावरांचे चारा खाण्याचे प्रमाण कमी होते व दुग्धोत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. शेळ्या-मेंढ्यामध्ये अशा जखमा झाल्यास त्यांना धनुर्वात होतो.
उपाय
- जनावरांचा गोठा स्वच्छ व कोरडा ठेवावा.
- जखम पोटॅशिअम परमॅगनेटने स्वच्छ करून मलमपट्टी करावी.
पावसाळ्यातील संसर्गजन्य आजार (Diseases Of Cattle In Rainy Season) : पावसाळ्यात जनावरांना घटसर्प, फऱ्या, पायलाग यासारखे संसर्गजन्य आजार (Contagious Disease In Cattle) होतात. दमट वातावरणात घटसर्पासारखे श्वसनाचे आजार जास्त प्रमाणात दिसून येतात. या आजारात जनावरांच्या छातीत पाणी होते, खालच्या जबड्याखाली सूज येते, श्वासोच्छवास करायला त्रास होतो, जनावरास 104 ते 105 अंश फॅरेनहाईट ताप येतो. संसर्ग झालेल्या जनावरांपैकी 90 टक्के जनावरे मृत्युमुखी पडतात.
उपाय
- पावसाळ्याच्या (Rainy Season) सुरवातीला किंवा उन्हाळ्यात मे-जून महिन्यात जनावरांना या आजारावर प्रतिबंधात्मक लस (Preventive Vaccination In Cattle) टोचावी. त्याप्रमाणे फऱ्या, पायलाग, काळरोग, धनुर्वात याही आजारावर लसीकरण करून घ्यावे.
गढूळ पाण्यामुळे होणारे आजार: पावसाळ्यात पाणी गढूळ होण्याची शक्यता अधिक असते. गढूळ पाण्यामुळे रोगजंतूंचा प्रादुर्भाव वाढतो (Diseases Of Cattle In Rainy Season) .
उपाय
- खाद्याच्या गव्हाणी व पाण्याच्या टाक्यांना चुना लावावा. पाणी शुद्ध होण्याकरिता पाण्यात 1 टक्का पोटॅशियम परमॅंगनेट मिसळावे.
गोचीड, गोमाश्यांचा प्रादुर्भाव: गोचीडांची (Tick Problem) लागण जास्त झाल्यास जनावरांच्या लघवीमध्ये रक्त येते, त्वचेला खाज सुटते, गोचिडांमुळे जनावरांना विषमज्वर आजार (Diseases Of Cattle In Rainy Season) होतो.
उपाय
- जनावरांच्या अंगावर व गोठ्यात गोचीड, गोमाशी प्रतिबंधक औषधांची शिफारसीनुसारच फवारणी करावी.
- गोठ्यातील शेण, मलमुत्राची वेळोवेळी साफसफाई करून गोठा स्वच्छ, कोरडा व हवेशीर ठेवावा.
दुभत्या जनावरांमध्ये होणारा स्तनदाह: जनावर व्यायल्यानंतर गोठ्यामध्ये शेण, मलमूत्र असलेल्या ठिकाणी बसल्यास कासेच्या छिद्रांतून रोगजंतू कासेमध्ये प्रवेश करतात व स्तनदाह होण्याची शक्यता वाढते.
उपाय
- स्तनदाह टाळण्यासाठी दुधाळ जनावरांचा गोठा स्वच्छ व कोरडा ठेवावा.
- जनावरांची कास जंतुनाशक औषधांनी धुऊन घ्यावी.
- दूध काढताना हात स्वच्छ धुवावेत. आजारी जनावरांचे दूध शेवटी काढावे.
- स्तनावर जखम झाली असल्यास त्यावर वेळीच औषधोपचार करावेत.
बुळकांडी: या आजारामुळे (Diseases Of Cattle In Rainy Season) जनावरांना दुर्गंधी युक्त जुलाब होते, जिभेवर, आतड्यांवर तसेच त्वचेवर बारीक पुटकुळ्यांसारखे फोड येतात. ताप येऊन डोळ्यांतून व नाकातून पाणी वाहते. डोळे लालसर होतात. शरीरातील पाणी कमी होऊन जनावरांना तीव्र अशक्तपणा येतो व 4 ते 8 दिवसांत जनावर दगावते.
उपाय
- या आजाराविरूद्ध लसीकरण करावे व गोठ्यांची नियमित स्वच्छता करावी.
- लागण झालेल्या जनावरांना इतर जनावरांपासून वेगळे बांधावे.
- आजारी जनावरांची विष्ठा गोठ्यापासून दूर ठेवून खोल पुरावी.
- प्रतिजैविकांचा वैद्यकीय सल्ल्यानुसार योग्य प्रमाणात वापर करावा.
अतिसार (हगवण): पावसाळ्यात बऱ्याचदा जनावरांना गढूळ पाणी प्यावे लागते, त्यामुळे या आजाराचा संसर्ग होऊन जनावरे अतिसारास (Diseases Of Cattle In Rainy Season) बळी पडतात.
उपाय
- प्रतिबंधात्मक उपचारामध्ये जनावरांची वैयक्तिक, तसेच गोठ्याची स्वच्छता राखणे, तसेच जनावरांना स्वच्छ पाणी पाजावे.
- निरोगी जनावरांना आजारी जनावरांपासून दूर ठेवावे.
- पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषधोपचार करावेत.
सर्दी पडसे: वातावरणातील बदल, अति थंडी किंवा पावसात भिजल्याने जनावरांमध्ये हा आजार दिसून येतो. नाकातून सारखे पाणी वाहणे, ताप येणे, तसेच शिंका येऊन नाकातून चिकट द्रव बाहेर पडतो व त्यामुळे नाकातील भाग लालसर होतो. काही प्रमाणात तापही दिसून येतो (Diseases Of Cattle In Rainy Season) .
उपाय
- प्रतिबंधात्मक उपचारामध्ये पावसाळ्यात कृत्रिम ऊब उपलब्ध करून देण्यासाठी गोणपाटाचा वापर करावा.
- गोठा स्वच्छ, कोरडा ठेवावा.
- जनावरांचे नाक, पोटॅशच्या पाण्याने स्वच्छ धुवावे.
- पशु वैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिजैविकाची मात्रा द्यावी.