Leopard Attack: बिबट्याचा हल्ला रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित पूर्वसूचना यंत्र!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: या गावात बिबट्याचा हल्ला (Leopard Attack) झाला, किंवा बिबट्याच्या हल्ल्यात थोडक्यात बचावले गेले असे तुम्ही वर्तमानपत्रात किंवा बातम्यांमध्ये नेहमी वाचत किंवा ऐकत असाल (Leopard Attack News). मानव आणि बिबट्याचा संघर्ष काही नवीन नाही. परंतु जर असे काही करता आले की ज्यामुळे बिबट्याची (Leopard Attack) पूर्वसूचना मिळेल तर कितीतरी जणांचे जीव वाचवता येईल.  

जुन्नर तालुक्यात मानव-बिबट्याचा संघर्ष (Leopard Attack) प्रचंड प्रमाणात वाढलेला दिसतोय. यावर एक उपाय म्हणून बोरी बुद्रुक येथील साईनगर येथे जुन्नर विभागाच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आधारित वन्य प्राणी (Wild Animals) पूर्व सूचना यंत्र (Early Warning Device) बसविण्यात आले आहे.

या यंत्रामध्ये लाइट व्यवस्था व कॅमेरा बसविला असून, दिवसा 500 मीटर, तर रात्रीच्या वेळी 100 मीटरपर्यंत वन्यप्राण्यांच्या हालचालीचे वेध हे यंत्र घेते, परंतु या यंत्रातील कॅमेरा फक्त अस्वल, बिबट्या, वाघ दिसल्यावर सायरन देऊन संबंधित परिसरातील नागरिकांना धोक्याची सूचना देते.

या यंत्रणेमुळे आजूबाजूच्या परिसरात वन्यप्राण्यांच्या हालचाली दिसून आल्यास संबंधित कंपनी, वनाधिकारी, रेस्क्यू मेंबर यांना संदेश व चित्रफित अथवा फोटो जातो. या संदेशाच्या माध्यमातून वनाधिकारी फोन करून संबंधित परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती करत असतात व ताबडतोब त्या ठिकाणी रेस्क्यू टीम पाठविले जाते. त्यामुळे परिसरातील लोकांना बिबट आल्याची (Leopard Attack) सूचना किंवा माहिती मिळते.

वनविभागाचा प्रयोग (Forest Department Experiment)
हे यंत्र वनविभागाच्या(Forest Department) माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर बसवण्यात आले असून, यामध्ये अजून कोणत्या सुधारणा करता येतील यासाठी वनविभाग प्रयत्न करीत आहे, अशी माहिती वनक्षेत्रपाल वैभव काकडे यांनी दिली आहे. या यंत्राद्वारे जो संदेश सूचना मिळते ती संबंधित कंपनी, वनाधिकारी व रेस्क्यू टीमकडे जाते तो संदेश स्थानिक पातळीवर पोहोचेपर्यंत दहा ते पंधरा मिनिटे जातात दरम्यानच्या काळात बिबट्या हल्ला (Leopard Attack) करु शकतो. त्यामुळे आवश्यक ती सावधगिरी पाळणे सुद्धा गरजेचे आहे.