Toll Free Number For The Farmers: शेतकरी बंधुंनो, शेतीशी निगडित शंका समस्या आहे का? डायल करा हा टोल फ्री नंबर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: खरीप हंगाम सुरू झालेला आहे (Toll Free Number For The Farmers). आणि शेतकरी तयारीला लागलेला आहे. परंतु शेतीशी निगडीत अनेक प्रश्न शेतकर्‍यांना सतावत असतात. महाराष्ट्र शासन,कृषी विभागाकडून (Department Of Agriculture Maharashtra) शेतकर्‍यांच्या शेतीशी निगडित शंका व समस्यांचे (Agriculture Problems And Doubts) समर्पक निरसन व मार्गदर्शन करण्यासाठी टोल फ्री (Toll Free Number For The Farmers) कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. हा कक्ष कार्यालयीन कामाच्या दिवशी सुद्धा सुरू आहे.

टोल फ्री (Toll Free Number For The Farmers) कक्षामध्ये संपर्कासाठी 1800 233 4000 हा लॅन्डलाईन व 9822446655 हा मोबाईल व्हाट्स अप क्रमांक शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला आहे. खालीलप्रमाणे शंकांचे निरसन करण्यासाठी शेतकरी (Maharashtra Farmers) बांधव कृषी विभागाशी संपर्क करू शकतात.

टोल फ्री क्रमांक 1800 233 4000 (Toll Free Number For The Farmers)

  • संपूर्ण वर्षभर सुरू आहे. 
  • खते बियाणे कीटकनाशके यांची खरीप रब्बी हंगामातील किंमत उपलब्धता गुणवत्ता बाबत शंका निरसन करण्यासाठी
  • कृषी विभागाचे निगडित मृदा संधारण विस्तार सांख्यिकी प्रक्रिया व नियोजन, फलोत्पादन, निविष्ठा व गुणनियंत्रण, कृषी यंत्रीकिकरण इत्यादी संबंधित शंकांचे निरसन करण्यासाठी.
  • संबंधित जिल्ह्यांचे कृषी विभागाचे संपर्क क्रमांक (Toll Free Number For The Farmers) कृषी विद्यापीठांचे संपर्क क्रमांक आवश्यकता असल्यास दिले जातात.

टोल फ्री क्रमांक 9822446655 (Toll Free Number For The Farmers)

  • केवळ संदेश पाठवण्यासाठी.
  • खरीप हंगाम व रब्बी हंगामात कृषी निविष्ठाची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकिंगबाबतच्या तक्रारी नोंदवताना शेतकर्‍यांनी आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, अडचणी किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशील व्हाट्सअप वर पाठवणेसाठी उपलब्ध आहे.

आवाहन
शेतकरी (Farmers) बांधवांनी सदर टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून व मार्गदर्शन घेऊन आपल्या शंकांचे निरसन करावे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

सदर टोल फ्री क्रमांक कार्यालयीन कामाच्या दिवशी सकाळी 8.00 ते संध्याकाळी 8.00 वाजेपर्यंत सुरू राहील.