हॅलो कृषी ऑनलाईन: मेंढ्यांच्या कळपांना (Sheep Migration) कोकणातील पावसाचा सर्वात जास्त त्रास होतो. कोकण पट्ट्यात पावसाची चाहुल लागताच घोड्याच्या पाठीवर संसार लादून घर सोडणारे कोकणातील धनगर बांधव पशुधन (Livestock) जगवण्यासाठी मेंढ्यांचे कळप घेऊन मजल-दरमजल करीत मिरज पूर्वभागात पोहोचला आहे (Sheep Migration). मेंढ्यांना चरण्यासाठी त्यांचा मराठवाड्यापर्यंत (Marathwada) प्रवास होतो (Sheep Migration).
कोकणातील (Konkan) धनगर बांधवांचा मेंढ्यापालन (Sheep Farming) हा मुख्य व्यवसाय आहे. आठ महिने आपल्या भागात मेंढ्या पालनाचे काम करणारे धनगर बांधव पावसाची चाहुल लागताच स्थलांतराच्या (Sheep Migration) मागे लागतो, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, गडहिंग्लज, मलकापूर, अक्कोळसह कोकण पट्ट्यातील अनेक भागात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पावसाचा जोर असतो.
मेंढ्यांना चरण्यासाठी (Sheep Grazing) हा कालावधी अडचणीचा ठरतो. पावसाळ्यातील रोगराईपासून बचावासाठी तसेच दलदलीमुळे अडचण होत असल्याने हा धनगर बांधव पावसाळ्यात पशुपालनासाठी सुरक्षित व पावसाचे प्रमाण कमी असलेल्या सांगली, सोलापूर जिल्ह्यात दाखल होतो (Sheep Migration).
या भागातील शेतकर्याकडून या मेंढ्यांना शेतात बसविण्यासाठी मागणी असते, मेंढ्या बसविण्याच्या बदल्यात शेतकर्याकडून मेंढपाळांना मोबदलाही दिला जातो. सध्या मिरज तालुक्यात दाखल झालेला मेंढपाळ पावसाचा अंदाज घेत सोलापूरच्या दिशेने जात आहे.
दिवसभर मेंढ्यांना हिंडविल्यानंतर शेतकर्यांच्या मागणीनुसार मोकळ्या रानात मुक्काम करतात. एका कळपात दोनशेहून अधिक मेंढ्या असतात, असे दोन ते तीन कळप शेतीत बसल्यास मेंढीच्या लेंड्यांचा खताच्या रुपात (Sheep Manure) शेत जमिनीला मोठा लाभ होतो.
चार महिन्यानंतर लागतात परतीचे वेध
कोकण पट्ट्यातील पावसाचा जोर कमी झाल्यानंतर शेकडो किलोमीटर पायपीट झाल्यावर जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीनंतर मेंढपाळ गावाकडे जाण्यासाठी परतीच्या मार्गाला लागतात.