Maharashtra Budget 2024: महायुती सरकारचं अंतरिम बजेट सादर; जाणून घ्या महत्त्वाच्या घोषणा आणि मुद्दे!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: महायुती (Maharashtra Government) सरकारचं अंतरिम बजेट (Maharashtra Budget 2024) अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar Finance Minister) यांच्याकडून आज सभागृहात सादर करण्यात आलेला आहे. या बजेटमध्ये त्यांनी अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. जाणून घेऊ या बजेटमधील (Maharashtra Budget 2024) लक्षवेधी घोषणा आणि मुद्दे.

  • मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजना: महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य स्वावलंबनासाठी 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना दर महा 1500 रुपये देणार. या योजनेसाठी दरवर्षी 46 हजार कोटी देण्यात येईल. जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल (Mukhyamantri Yojana) .
  • प्रत्येक कुटुंबाला 3 गॅस सिलिंडर मोफत: एलपीजी गॅस प्रत्येक घराला देण्यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला 3 गॅस सिलिंडर मोफत देणारी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना’ जाहीर करण्यात आली. 52 लाख 16 हजार 400 कुटुंबांना या योजनेचा (Government Schemes) लाभ मिळणार.
  • राज्यातील 10 हजार महिलांना पिंक ई रिक्षा खरेदीसाठी 10 हजार रुपये देणार (Maharashtra Budget 2024).
  • आई योजना सुरू करण्यात आली आहे. त्यातून 10 हजार रोजगार निर्माण होणार आहे. महिला अत्याचाराची सुनावणी लवकर होण्यासाठी 100 विशेष न्यायालयांना निधी देणार. राज्यातील 10 हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी 10 हजार रुपये देण्यात येणार आहे.
  • कापूस आणि सोयाबीन नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना प्रत्येकी 5 हजार रुपये
  • वन्य प्राण्याच्या हल्यात मृत्यू झाल्यास 25 लाख रू
  • मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना: मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे. कृषी पंपांना मोफत वीज, लाभार्थी- 7.5 एचपी मोटर असलेल्या लहान, मध्यम शेतकर्‍यांना मोफत वीज दिली जाईल. 44 लाख शेतकर्‍यांना फायदा होणार आहे. 8.50 लाख शेतकर्‍यांना सौर ऊर्जा पंप दिले जाणार आहेत (Maharashtra Budget 2024).
  • पशुधन हानीच्या भरपाईच्या रक्कमेत वाढ
  • गाईच्या दुधासाठी 5 रुपयाचं अनुदान प्रति लिटर देण्याचा निर्णय जाहीर. 1 जुलैपासून अनुदान दिले जाणार.
  • उपसा सिंचन योजनेसाठी 4 हजार कोटींची आवश्यकता आहे. वैनगंगा, नळगंगा तसेच गोसीखुर्द प्रकल्पात पाणी वळवण्याचे नियोजन आहे. अतिरिक्त पाणी दुष्काळग्रस्त भागाला वळवण्याचा कार्यक्रम राबवणार.
  • दरवर्षी 500 कौशल्य विकास केंद्र वाढवणार. मुंबई, पुणे, नागपूर, कराड, नाशिक येथील तंत्र शिक्षण संस्था मध्ये दरवर्षी 500 कौशल्य विकास केंद्र वाढवणार.
  • पेट्रोलवरील कर 26 टक्के वरून 25 टक्के करण्यात येणार आहे.  मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात जास्त होता. या बदलामुळे या तिन्ही महापालिकेतील पेट्रोलचा दर 65 पैसे आणि डिझेलचा दर अंदाजे 2 रुपये 7 पैसे कमी होणार आहे (Maharashtra Budget 2024).
  • पंढरपूरच्या वारीचा जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव. पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या मुख्य पालख्यातील दिंडींना प्रति दिंडी 20 हजार रूपये. ‘निर्मल वारी’ साठी 36 कोटी 71 लाख रूपयांचा निधी. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून देहू-आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकर्‍यांची आरोग्य तपासणी, मोफत औषधोपचार (Maharashtra Budget 2024).
  • स्तन गर्भाशय कर्करोगाच्या निदानासाठी आरोग्य केंद्रात 78 हजार कोटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
  • लखपती दिदी (Lakhapati Didi): महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 7 लाख नवीन गटांची स्थापना-बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत 15 हजार रूपयांवरून 30 हजार रुपये वाढ.
  • महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना ‘उमेद मार्ट’ आणि ‘ई-कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म’ याद्वारे आतापर्यंत 15 लाख महिला ‘लखपती दिदी’, या वर्षात 25 लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्ट (Maharashtra Budget 2024).