हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या कापसाला मिळत असलेला बाजारभाव (Cotton Rate) म्हणजे वरातीमागून घोडे असल्याची परिस्थिती आहे. मानवत (Manavat) शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Krushi Utpanna Bajar Samiti) यार्डात गुरूवारी झालेल्या लिलावात कापसाला कापसाला वरचा दर 8 हजार 50 रुपये मिळाला. यंदाच्या हंगामात सात महिन्याच्या कालावधीत तिसऱ्यांदा कापसाचे दर आठ हजारावर गेले आहेत. शेतकऱ्याकडील कापूस संपल्यानंतर बाजार भावात (Cotton Rate) तेजी आल्याचे चित्र दिसून येत आहे.
यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डात (Krushi Utpanna Bajar Samiti Yard) 14 नोव्हेंबर पासून लिलावाद्वारे कापसाच्या खरेदी (Cotton Purchase)- विक्रीला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी कापसाला सरासरी सात हजार चारशे रुपये दर मिळाला. कापसाच्या दरात 100 ते 150 रुपयाची घसरण दिसून आली. पूर्ण डिसेंबर महिन्यात सात हजार 50 ते सात हजारपर्यंत कापसाला भाव (Cotton Rate) मिळाला.
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तर 6 हजार 800 रुपयापर्यंत भाव खाली आले होते. फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरा दिवसात भावाची स्थिती जैसे थे दिसून आली. तर उर्वरित 13 दिवसात कापसाच्या भावात तेजी दिसून आली. 29 फेब्रुवारीला सात हजार 700 वर भाव (Cotton Rate) पोहोचले.
7 मार्च ते 13 मार्च दरम्यान कापसाच्या भाव आठ हजारावर गेले. 13 मार्च दरम्यान कापसाचे भाव पुन्हा 200 ते 300 रूपयांनी उतरले. मात्र, दोन एप्रिल पासून पुन्हा कापसाचे भाव आठ हजारावर गेले. 2 एप्रिलला कापसाला सरासरी आठ हजार पन्नास रुपये दर मिळाला होता. 3 एप्रिल ते 11 एप्रिल दरम्यान कापसाला सरासरी सात हजार 800 ते सात हजार 900 रुपये दर (Cotton Rate) मिळाला.
मात्र, पुन्हा बाजार भावात घसरण झाल्याचे दिसून आले. 1 ते 11 मे दरम्यान सात हजार 450 ते सात हजार 550 रुपये दर मिळत असल्याचे चित्र कापूस बाजारपेठेत दिसून येत होते. मात्र, 26 जून पासून कापसाचे दर आठ हजारावर गेल्याचे दिसून आले. 28 जूनला कापसाला 8 हजारवरचा दर मिळाला. शेतकऱ्यांकडचा (Farmers) कापूस संपल्यानंतर बाजारपेठेत कापसाचे भाव (Cotton Rate) वाढत असल्याचे चित्र आहे.
पूर्ण हंगामात तीनदा कापूस गेला आठ हजारावर
• नोव्हेंबर पासून यावर्षीच्या कापूस हंगामाला सुरुवात झाली. या हंगामात कापसाचे दर सात ते 13 मार्च दरम्यान आठ हजारावर गेल्याचे चित्र पहावयास मिळाले. यानंतर पुन्हा कापसाच्या भावात घसरगुंडी दिसून आली. यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा कापसाचे दर आठ हजारावर गेले.
मात्र, पुन्हा कापसाचे बाजारभाव प्रति क्विंटल 400 ते 500 रूपयांनी उतरण्याचे चित्र बाजारपेठेत दिसून आले होते. मात्र, 26 जून ते 28 जून दरम्यान पुन्हा कापसाला आठ हजारावर दर मिळाला. संपूर्ण हंगामात तिसऱ्यांदा कापूस आठ हजारावर गेला आहे.
नवा उगवला तरी जुन्या कापसाची विक्री सुरूच
• यंदाच्या खरीप हंगामात पेरणी झालेल्या कापसाचे उगवण झाल्याचे चित्र शेत शिवारात दिसून येत असल्याचे चित्र आहे.
• दुसरीकडे गतवर्षीच्या खरीप हंगामातील कापूस पावसाळ्याचा जून महिना संपत आला तरी शेतकरी लिलावाद्वारे कापूस विक्री करत असल्याचे चित्र मार्केट यार्डात दिसून येत आहे.
मागील दहा दिवसांतील कापसाचे सरासरी दर (रू.)
18 जून – 7540
19 जून – 7500
20 जून – 7600
21 जून – 7650
22 जून – 7600
24 जून – 7750
25 जून – 7900
26 जून – 7975
27 जून – 8050
28 जून – 7950
गतवर्षीच्या हंगामात कापसाला कमी भाव मिळाला असला तरी ठोक उत्पन्न म्हणून शेतकर्यांनी याही वर्षी मोठ्या प्रमाणावर कापूस लागवडीकडे (Cotton Cultivation) ओढा वाढवला आहे. खर्च जास्त झाला तरी भाव चांगला मिळेल या आशेवरही कापसाची शेतकर्यांनी लागवड केली आहे. यावर्षी भाव वाढण्याची शक्यता आहे.