Fodder Seeds: पशुसंवर्धन विभागाकडून लातूर जिल्ह्यासाठी सव्वा कोटीचे चारा बियाणे! लाभ घेण्यासाठी ‘येथे’ करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: पशुधनास पौष्टिक हिरवा चारा (Fodder Seeds) उपलब्ध व्हावा यासाठी लातूर (Latur) जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या (Department Of Animal Husbandry) वतीने यंदाच्या खरीप हंगामात पशुपालकांना (Dairy Farmers) 1 कोटी 32 लाखांचे चारा बियाणे (Fodder Seeds) उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

लवकर संततधार पाऊस न झाल्यास जिल्ह्यात चारा टंचाई (Fodder Shortage) जाणवण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात अल्प पर्जन्यमान झाले. वार्षिक सरासरीच्या तुलनेत 73 टक्के पाऊस (Rain) झाला होता. त्यामुळे खरीप हंगामातील (Kharif) पिकांच्या उत्पादनात घट झाली. शिवाय, रब्बी पिकांच्या उत्पन्नावरही परिणाम झाला होता. त्यातच यंदाचा उन्हाळा अधिक कडक जाणवल्याने पशुधनाच्या चाऱ्याचा (Fodder Seeds) प्रश्न निर्माण होण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने परजिल्ह्यात चारा विक्रीस बंदी घालण्यात आली होती.

यावर्षी मॉन्सूनचे लवकर आगमन झाले असले तरी संततधार पाऊस झालेला नाही. त्यामुळे हिरव्या चाऱ्याचा (Green Fodder) प्रश्न उ‌द्भवण्याची भीती नाकारता येत नाही, असे गृहीत धरून जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने हिरवा चारा टंचाई निर्मुलनासाठी उपाय योजना सुरू केल्या आहेत.

साडेपाच हजार शेतकर्‍यांना लाभ

लातूर जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत अनुदानावर चारा बियाणे (Fodder Seeds) उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचा जिल्ह्यातील जवळपास साडेपाच हजार पशुपालकांना लाभ होणार आहे. अनुदानावर उच्च गुणवत्तेचे संकरित शुगर ग्रेस ज्वारी चारा बियाणे 10 हजार 632 किलो, मॅक्स सायलेज मका चारा बियाणे 26 हजार 580 किलो असे एकूण 37 हजार 212 किलो चारा बियाणे मिळणार आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

37 हजार किलो बियाणे

खरीप हंगामात पुरेसा पाऊस न झाल्यास चारा टंचाई जाणवू शकते, अशी परिस्थिती उद्भवू नये. पशुधनास हिरवा चारा उपलब्ध व्हावा म्हणून जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत शंभर टक्के अनुदानावर 37 हजार 212 किलो चारा बियाणे (Fodder Seeds) उपलब्ध करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने 1 कोटी 32 लाखांचा निधी उपलब्ध उपलब्ध करून दिला आहे.

योजनेच्या लाभासाठी तत्काळ अर्ज करा

लातूर (Latur) जिल्ह्यात गायवर्गीय पशुधन 2 लाख 56 हजार 180, म्हैसवर्गीय पशुधन 2 लाख 55 हजार 470 आहे. पशुधनास पौष्टिक चारा उपलब्ध व्हावा म्हणून शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे (Fodder Seeds On Subsidy) देण्यात येणार आहे. त्यासाठी पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात अर्जासह 7/12 देणे आवश्यक आहे.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.