हॅलो कृषी ऑनलाईन: कृषी आणि ग्रामीण क्षेत्रातील (AgriSURE) असलेल्या आव्हानाचा सामना करण्यासाठी तसेच या क्षेत्रातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी इनोव्हेशन आणि तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. आपले बहुतेक शेतकरी अल्पभूधारक (Small Farmers) आहेत. यासाठी उत्पादकता वाढवण्यावर भर देणे आवश्यक असून त्यासाठी तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. हे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पद्धतशीर यांत्रिकीकरण विकसित करणे आवश्यक आहे (AgriSURE).
कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग (Department of Agriculture and Farmers Welfare) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) च्या सहकार्याने कृषी स्टार्ट-अप आणि उद्योजकांसाठी ‘ऍग्रीशुअर’ (AgriSURE) हा कृषी निधी लवकरच जाहीर करणार आहे. कृषी आणि संलग्न क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण, तंत्रज्ञान-आधारित प्रभावी पावलं उचलून धाडसी निर्णय घेत गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे हे या दूरदर्शी उपक्रमाचे उद्दिष्ट आहे
त्यासाठी मुंबई येथे सर्व भागधारकांची या संदर्भात बैठक झाली असून या अंतर्गत 750 कोटी रूपयांच्या श्रेणी-II पर्यायी गुंतवणूक निधी (AIF) ची स्थापना करून भारताच्या कृषी क्षेत्रात नाविन्य आणि शाश्वततेला चालना देण्याचे उद्दिष्ट या उपक्रमाद्वारा (AgriSURE) पूर्ण करण्यात येणार आहे.
हा निधी कृषी क्षेत्रातील इनोव्हेशन (Agriculture Innovation), कृषी उत्पादन मूल्य साखळी बळकट करणे, ग्रामीण पायाभूत सुविधा निर्माण करणे, रोजगार निर्मिती (Employment Generation) आणि शेतकरी उत्पादक संस्थांना (FPO) साहाय्य देण्यावर लक्ष केंद्रित करेल. त्याबरोबर, हा निधी शेतकर्यांसाठी माहिती तंत्रज्ञान-आधारित उपाय आणि यंत्रसामुग्री भाड्याने देण्याच्या सेवांना प्रोत्साहन देईल. NABARD ची पूर्ण मालकीची उप-कंपनी NABVENTURES ही Agri SURE ची निधी व्यवस्थापक असेल. हा निधी 10 वर्षांसाठी कार्यरत राहील या दृष्टीने डिझाइन केला असून, दोन किंवा अधिक वर्षांपर्यंत वाढवता येईल.
या निधीची वैशिष्ट्ये म्हणजे 750 कोटी रूपयांच्या प्रारंभिक निधीसह हा निधी स्थापन केला जाईल. नाबार्ड आणि कृषी मंत्रालयाकडून प्रत्येकी 250 कोटी आणि इतर संस्थांकडून 250 कोटी रुपये यासाठी घेतले जातील.
या निधीच्या सहाय्याने कृषी क्षेत्रातील अभिनव आणि शाश्वत उपाय प्रदान करण्यासाठी स्टार्ट अप्सना पाठिंबा देण्याचे उद्दिष्ट आहे. AgriSURE च्या घोषणेबाबत बोलताना नाबार्डचे अध्यक्ष शाजी के. व्ही. म्हणाले, कृषी क्षेत्राचे डिजिटलायझेशन ही कृषी मूल्य साखळी वाढवण्यासाठी काळाची गरज आहे, कारण विकासाची पुढली लाट इनोव्हेशन यातून येणार आहे. किमान खर्चासह शेवटच्या गावाला जोडण्यासाठी कृषी क्षेत्रातील फिनटेक इनोव्हेशन ही एक महत्त्वाची बाब आहे.
शेतकरी (Farmer) हा कृषी मूल्याचा पाया आहे, आणि त्यांना अतिशय बारकाईने हाताळणे आणि उपाय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. केवळ कर्ज पुरवठा करून कृषी क्षेत्रातील (AgriSURE) समस्या सुटणार नाही. इनोव्हेशन द्वारे पुढल्या स्तराचा विकास होईल आणि त्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी संस्थांनी सह-भागीदारी करणे आवश्यक आहे. या निधीद्वारा प्रारंभिक टप्प्यातील नव संशोधकांना मदत करणे आणि शेतकर्यांना व्यवहार्य, शाश्वत आणि टिकाऊ तंत्रज्ञान उपायांसह सहाय्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
नाबार्डने कृषी क्षेत्राच्या अनियंत्रित समस्या दूर करण्यासाठी युवा नव संशोधकांना आपल्या देशाच्या ‘विकसित भारत’ च्या प्रवासात त्यांच्या अभिनव उपायांसह योगदान देण्याचे आवाहन केले आहे. या बैठकीला बँका, वित्तीय संस्था, विमा कंपन्या, AIFs आणि कृषी क्षेत्रात कार्यरत स्टार्टअप्सचे (AgriSURE) प्रतिनिधी एकत्र आले होते.