MSP For Sugar: साखरेला लवकरच मिळणार 4,200 रूपये इतका हमीभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: साखरेला लवकरच किमान आधारभूत किंमत (MSP For Sugar) घोषित होणार असून ती 4,200 रुपये होणार आहे.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष (President of National Federation of Cooperative Sugar Factory) आणि राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाचे संचालक, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांची केंद्रीय मंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांच्याबरोबर दिल्लीत बैठक झाली असून, केंद्रीय मंत्रिमंडळात निर्णय घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे.

क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या 102 व्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी हर्षवर्धन पाटील हे वाळवा येथे सोमवारी आले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, सहकारी साखर कारखानदारीबाबत (Sahkari Sakhar Karkhana) पुढील दहा वर्षांचा रोड मॅप बनविला असून, साखर उद्योगात (Sugar Industry) आमूलाग्र बदल केले जाणार आहेत.

उसाची एफआरपी (Sugarcane FRP) वाढत असताना त्या तुलनेत साखरेचे दर (MSP For Sugar) वाढत नाहीत. त्यामुळे साखर कारखान्यांना (Sugar Factory) मिळणारी तफावतीची रक्कम तुटपुंजी स्वरुपात असल्याने कारखानदारी अडचणीत येत आहे.

सहकारी साखर कारखानदारीवर बरेच घटक अवलंबून असून रोजगारक्षम व्यवसाय आहे. यामुळे साखर उद्योग वाचवायचा असेल तर साखरेचे किमान मूल्य (MSP For Sugar) प्रति क्विंटल 4,200 रुपये करण्यात यावे अशी मागणी 524 सहकारी साखर कारखान्याच्या राष्ट्रीय संघाने केली आहे. हा प्रस्ताव आता केंद्रीय मंत्रिमंडळासमोर आहे. लवकरच याला मंजूरी मिळेल, असे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले.

साखर उद्योग वाचविण्यासाठी साखरेचे किमान मूल्य (MSP For Sugar) प्रति क्विंटल 4,200 रुपये करण्यात येणे हा साखर कारखान्यांसाठी एक महत्त्वाचे पाऊल  ठरेल.