हॅलो कृषी ऑनलाईन: पावसाळ्यात जनावरांना (Livestock Vaccination) मोठ्या प्रमाणात आजार (Animal Diseases) होतात. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून (Maharashtra Government) जिल्हा पशुवैद्यकीय कार्यालयाकडे लसींच्या मोफत मात्रा (Free Doses Of Vaccines) देण्यात आल्या असून, लसीकरण (Livestock Vaccination) सुरू आहे.
जनावरांना आजारांची लागण होऊ नये यासाठी लम्पी चर्म, लाळ्या खुरकुत या प्रमुख आजारासह इतर आजारांसाठी लसीच्या (Livestock Vaccination) मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सध्या परभणी जिल्ह्यात (Parbhani District) 4 लाख 96 हजार इतकी गाय वर्गातील जनावरांची संख्या आहे. मात्र, फऱ्या, घटसर्प या आजारांसाठी 3 लाख 56 हजार लसीच्या मात्रा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत, तर लम्पी चर्म आजारासाठी 3 लाख 97 हजार 100 लसीच्या मात्रा मिळाल्या असून, दोन टप्प्यांत हे लसीकरण (Livestock Vaccination) होणार आहे.
सध्या थैमान घातलेल्या लाळ्या खुरकुत या आजारासाठी जिल्ह्याला 7 लाख 77 हजार इतक्या लस मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आजारांची लागण होण्याची वाट न बघता शेतकर्यांनी आपल्या जनावरांचे पावसाळ्यात लसीकरण करून घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभाग (Department of Animal Husbandry) करीत आहे.
लम्पीचा धोका वाढलेलाच; दोनदा होणार लसीकरण
यावर्षी देखील लम्पी आजाराचा (Lumpy Skin Disease) धोका कायम आहे. यामुळे शासनाकडून मोफत दोन वेळा प्रत्येक जनावरांचे लसीकरण (Livestock Vaccination) होणार आहे. परभणी जिल्ह्यात 15 जुलैपर्यंत 3 लाख 93 हजार 310 जनावरांना लसीच्या मात्रा टोचण्यात आल्या आहेत. यासाठी 3 लाख 97 हजार 100 मात्रा आल्या होत्या. दरम्यान, मोफत लसीकरण करून घेणे प्रत्येक पशुपालकांची जबाबदारी आहे.
जनावरे जास्त; पण लसीच्या मात्रा कमी
जिल्ह्यातील गाय वर्गातील जनावरांची संख्या (20 व्या पशुगणनेनुसार) 4 लाख 96 हजार इतकी आहे, परंतु, या तुलनेत सगळ्या लसीकरणाच्या मात्रा 3 लाख 97 हजार, 3 लाख 57 हजार आलेल्या आहेत. यामुळे इतर एक ते दीड लाख जनावरांच्या लसीकरणाचे काय? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, पशुसंवर्धन विभागाकडून दाखल झालेल्या लसीकरणांतर्गत 99 टक्के लसीकरण (Livestock Vaccination) केले आहे.
जिल्ह्याला पशुधनासाठी किती लसीच्या मात्रा मिळाल्या?
आजाराचा प्रकार | उपलब्ध मात्रा | झालेले लसीकरण |
लम्पी चर्मरोग | 397100 | 393310 |
घटसर्प, फऱ्या | 356000 | 353864 |
लाळ खुरकत | 777500 | 762452 |
आंतरविषार | 184000 | 182930 |