हॅलो कृषी ऑनलाईन: राज्य सरकारने 2017 मध्ये (Crop Loan Waiver) छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत (Chhatrapati Shivaji Maharaj Shetkari Sanman Yojana) 25 हजार रुपये प्रोत्साहन अनुदानापासून पात्र; पण तांत्रिक मुद्यामुळे वंचित राहिलेल्या शेतकर्यांना (Farmers)पैसे देण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
राज्य सरकारने (Maharashtra Government) त्यावेळची माहिती मागवली असून, दोन दिवसांत जिल्हा बँकेकडे (District Bank)संबंधित शेतकर्यांची नावे पाठवण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. त्यानुसार सुमारे 22 हजार शेतकर्यांना 25 हजार रूपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो (Crop Loan Waiver).
केंद्र सरकारच्या थकीत पीक कर्ज माफ (Crop Loan Waiver) योजनेनंतर राज्य सरकारने 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणली होती.
यामध्ये थकबाकीदार शेतकर्यांना 50 हजार रूपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ, पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकर्यांना 25 हजार रूपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान, तर 50 हजार रुपयांच्या वरील थकीत पीक कर्जासाठी (Crop Loan Waiver) ‘ओटीएस’ योजना प्रभावीपणे राबवली होती.
यामध्ये जिल्ह्यातील 1 लाख 97 हजार 596 खातेदार शेतकऱ्यांना 373 कोटी 81 लाख 70 हजार रूपयांचा लाभ झाला होता. राज्यात 2019 नंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली.
यामध्ये दोन लाखांपर्यंतचे थकीत कर्ज माफ (Crop Loan Waiver) व पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकर्यांना 50 हजार रूपयांपर्यंत अनुदान देण्यात आले. या प्रोत्साहन अनुदानाचे भिजत घोंगडे कायम असताना आता राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत वंचित शेतकर्यांची माहिती मागवली आहे.
सहकार विभागाने जिल्हा बँकेच्या माध्यमातून विकास संस्थांकडून या शेतकर्यांची माहिती मागवली आहे. सोमवार (दि. 22) पर्यंत ही माहिती सहकार विभागाला देण्याचे नियोजन बँकेचे असून त्यादृष्टीने सूचनाही संबधितांना देण्यात आल्या आहेत. विधानसभा आचारसंहितेपूर्वी या वंचित शेतकर्यांना लाभ देता येईल का? याची चाचपणी करून निर्णय होण्याची शक्यता आहे.
छ. शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना : 2017
कर्ज माफीचे खातेदार 20,282
रक्कम 71.18 कोटी
प्रोत्साहन खातेदार 1,76,036
रक्कम 286.19 कोटी
ओटीएस पात्र खातेदार 1,278
रक्कम 16.43 कोटी
महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना : 2019
कर्ज माफीचे खातेदार 47,839
रक्कम 285.12 कोटी
प्रोत्साहन खातेदार 1,77,789
रक्कम 646.36 कोटी