हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या राज्यात पावसाने (Maharashtra Monsoon) चांगलाच जोर पकडला आहे. राज्यात पावसाने आतापर्यंत सरासरी ओलांडली (Average Rainfall) असून, एकूण पाऊस 123 टक्के, अर्थात 545 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी पाऊस (Maharashtra Monsoon) सरासरीच्या तुलनेत 422 मिलिमीटर अर्थात 95 टक्के पाऊस झाला होता.
या पावसामुळे राज्याच्या पाणी साठ्यातही (Maharashtra Water Storage) भरघोस वाढ झाली असून, राज्यात एकूण पाणीसाठा 560.39 टीएमसी अर्थात 39.17 टक्क्यांवर गेला आहे. गेल्या वर्षी याच तारखेला राज्यात 43.65 टक्के पाणीसाठा होता. संभाजीनगर विभागात सर्वांत कमी 12 टक्के पाणीसाठा आहे. राज्याची 22 जुलैपर्यंत सरासरी पाऊस 442.4 मिलिमीटर पडतो.
राज्यात सध्या कोकण व विदर्भात मुसळधार पाऊस (Maharashtra Monsoon) होत आहे. भंडारा, गोंदिया व पालघर या तीन जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) झाला आहे. एकूण 15 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे. 19 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. राज्यात आजही कोकण (Konkan Monsoon) व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे.
राज्यातील धरणांत एकूण पाणी साठ्याची (Dam Water Storage) क्षमता 48,254 दशलक्ष घनमीटर असून, राज्यात आजचा पाणीसाठा 15,864.88 दशलक्ष घनमीटर अर्थात 560.39 टीएमसी इतका झाला आहे. एकूण प्रकल्पीय साक्याच्या तुलनेत हा पाणीसाठा 39.17 टक्के इतका आहे.
विभागनिहाय पाणीसाठा
संभाजीनगर 12.13%
नाशिक 28.34%
पुणे 43.32%
अमरावती 45.57%
नागपूर 54.74%
कोकण 66.60%
राज्यात सर्वाधिक पाऊस सोलापूर जिल्ह्यात (Maharashtra Monsoon)
चंद्रपूर, गडचिरोली, तसेच यवतमाळ व वाशिम या जिल्ह्यांसह कोकणातील ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
राज्यात आतापर्यंत सर्वाधिक 192 टक्के अर्थात 324.6 मिलिमीटर पाऊस (Highest Rainfall District In Maharashtra) सोलापूर जिल्ह्यात नोंदवण्यात आला आहे. त्याखालोखाल सांगली जिल्ह्यात 386.58 मिलिमीटर (171.58 टक्के) पाऊस झाला आहे.
22 जुलैपर्यंतचा पाऊस
गेल्या वर्षी 422.1 मिमी 95.41%
या वर्षी 545 मिमी 123%