Seed Ball Sowing: ड्रोनच्या साहाय्याने 100 हेक्टर माळरानावर सीडबॉल्स पेरणी; महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: वृक्षारोपण करण्यासाठी सीड बॉल्सचा वापर (Seed Ball Sowing) याबद्दल आपण बरेचदा ऐकले असेल, परंतु ड्रोनच्या (Drones) सहाय्याने सीडबॉल्स पेरणी करण्याचा नाशिक तालुक्यात पहिलाच प्रयोग करण्यात आलेला आहे.   

जिल्हा प्रशासन आणि नाशिक वनविभाग (Nashik Forest Department) यांच्या सहकार्याने भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) कंपनीने नाशिक जिल्ह्यातील (Nashik) 100 हेक्टर माळरानावर प्रगत ड्रोन तंत्रज्ञान वापरून सिडबॉल्स पेरणीचा  (Seed Ball Sowing) शुभारंभ करण्यात आला. नाशिक तालुक्यातील गंगा म्हाळुंगी गावातील डोंगरावर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितित हा प्रयोग झाला. महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग (First Experiment In Maharashtra) असल्याचे सांगण्यात आले.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन कंपनीने (Bharat Petroliam) आपल्या सीएसआर निधितून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर (Sinner) नाशिक परिक्षेत्र, हिवरे बिलगे आणि गंगा म्हाळुंगी गाव या तीन वन परिक्षेत्रातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागात 100 हेक्टर खराब जमिनी आहेत. डोंगराळ असलेल्या या भागात माणूस तेथे जाऊ शकत नाही. अशा 100 हेक्टर क्षेत्रावर प्रगत ड्रोन तंत्रज्ञान (Drone) वापरून बीपीसीएल कंपनीने सिडबॉल्सच्या (Seed Ball Sowing) माध्यमातून दोन लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे.

जागेची निवड करताना जीआयएस मॅपिंग (GIS Mapping) वापरण्यात आले. स्थानिक नागरिक, सिडबॉलचे उत्पादन (Seed Ball Sowing) आणि ड्रोनचा वापर यासह सर्वसमावेशक नियोजन करण्यात आले आहे. याचा अहवाल शासनाला पाठविण्यात येणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राला रोल मॉडेल (पथदर्शक) ठरणार आहे

कायदा आणि सुव्यवस्था, जिल्ह्याचे प्रशासन सांभाळताना काही सामाजिक उपक्रमांना देखील सकारात्मक प्रतिसाद आणि प्रोत्साहन देणे गरजेचे असते. बीपीसीएल कंपनीने सामाजिक उपक्रमातून एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.