हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’(Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) या योजनेत 6 नवीन बदल करण्यात आले आहेत. या बदलामुळे राज्यातील पात्र महिलांसाठी या योजनेचा लाभ (Benefits) घेणं अधिक सोपं होणार आहे.
योजनेत झालेले बदल (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana New Changes)
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ बँकेचेच नाही तर पोस्टाचे खातेही ग्राह्य धरलं जाईल. म्हणजेच पोस्ट बँक खाते सुद्धा स्वीकारले (Postal Bank Account) जाईल.
- दुसऱ्या राज्यातील महिलेने महाराष्ट्रातील पुरुषाशी लग्न केल्यास तिलाही या योजनेचा लाभ मिळेल. यासाठी पतीची कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे.
- गावात दर शनिवारी लाभार्थी महिलांची यादी (Women Beneficiaries) समिती मार्फत वाचली जाईल आणि यात बदलही करता येतील.
- केंद्र सरकारच्या (Central Government) इतर योजनांचा लाभ घेणार्या महिलांनाही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकेल.
- नवविवाहित महिलांची लग्न नोंदणी तात्काळ (Marriage Registration) शक्य नसेल तर अशा परिस्थितीत पतीचं रेशनिंग कार्ड स्वीकारले जाईल.
- अर्ज करताना मिळणाऱ्या ओटीपीचा कालावधी आता 10 मिनिटांचा असेल.
काय फायदे होतील?
- महिलांसाठी अर्ज प्रक्रिया अधिक सोपी आणि सुलभ होईल.
- अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकेल.
- गैरप्रकारांना आळा घालण्यास मदत होईल.
- योजनेतील पारदर्शकता (Transparency) वाढेल.
राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सुरू करण्यात आलेली आहे. या योजने अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत.
ही योजना अधिकाधिक सुलभ व सहज होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार, राज्य सरकारने (Maharashtra Government) कागदपत्रांमध्ये शिथिलता आणली आहे. त्यात, आणखी शिथिलता आता ग्रामस्तरावरील समिती मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे लाभार्थी महिलांची यादी लवकरच जाहीर होणार असून 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान महिला भगिनींना योजनेचा (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) थेट लाभ म्हणून 2 महिन्यांची रक्कम 3000 रुपये बँक खात्यात जमा होईल.