हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्रात अजूनही पावसाच्या (Maharashtra Monsoon) विश्रांतीचे काही चिन्ह दिसत नाही आहे. हवामान विभागाने (IMD Pune) पुढील पाच दिवस म्हणजेच 30 जुलैपर्यंत राज्यात पडणार्या पावसाचे (Maharashtra Monsoon) अंदाज दिलेले आहेत. जाणून घेऊ या बद्दल सविस्तर.
26 ते 28 जुलैदरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात (Kolhapur Ghat Area) आजरा, भदुरगड, चांदगड, गगनबावडा, राधानगरी आणण शाहूवाडी ब्लॉक) आणि सातारा जिल्ह्यातील (महाबळेश्वर, जावळी, पाटण आणि सातारा ब्लॉक) येथे जोरदार ते अति जोरदार पाऊस अपेक्षित आहे (Maharashtra Monsoon).
26 जुलै म्हणजे आज कोकण (Konkan) व मध्य महाराष्ट्रातील घाट भागात तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार तर एक-दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात आज तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता (Maharashtra Monsoon) आहे.
27 जुलैला मध्य महाराष्ट्रातील घाट भागात तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार तर एक-दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कोकण (Konkan Monsoon) व विदर्भात (Vidarbha Monsoon) तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
28 जुलैला कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
29 व 30 जुलैला कोकण व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
कोकणातील रत्नागिरी, रायगड व पालघर जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट भागात व पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात भात, नाचणी आणि भाजीपाल्याची लागवड पुढे ढकलावी असा सल्ला तज्ज्ञांनी दिलेला आहे.