हॅलो कृषी ऑनलाईन: सिंजेंटा इंडियाने सोमवारी तांदूळ आणि टोमॅटोसह (Crop Protection Products) अनेक पिकांसाठी ‘मिराव्हिस ड्युओ’ (Miravis Duo) आणि ‘रिफ्लेक्ट टॉप’ (Reflect Top) ही दोन नवीन पीक संरक्षण उत्पादने (Crop Protection Products) बाजारात आणलेली आहेत.
सिंजेंटा इंडिया प्रा. लि. (Syngenta India Pvt. Ltd) ही जगातील अग्रगण्य कृषी कंपन्यांपैकी एक आहे, ज्यामध्ये सिंजेंटा पीक संरक्षण (Syngenta Crop Protection) आणि सिंजेंटा बियाणे (Syngenta Seeds) यांचा समावेश आहे.
एका निवेदनात, सिंजेंटा कडून नमूद करण्यात आले आहे की पिकांचे दर्जेदार उत्पादन सुनिश्चित करण्यासाठी ‘मिराव्हिस ड्युओ’ आणि ‘रिफ्लेक्ट टॉप’ हे पीक संरक्षण उत्पादने (Crop Protection Products) लाँच केली आहेत.
हे उत्पादन (Crop Protection Products) सुरुवातीला भारतातील चार प्रमुख पिके जसे मिरची, टोमॅटो, भुईमुग आणि द्राक्षे या पिकांसाठी वापरण्यात येईल नंतर जास्त पिकांसाठी यांचा वापर करता येईल.
नवीन पीक संरक्षण उत्पादनांची वैशिष्ट्ये (Crop Protection Products)
मिराव्हिस ड्युओ: हे अत्याधुनिक बुरशीनाशक टोमॅटो, मिरची, भुईमुग आणि द्राक्ष या पिकांसाठी शिफारस करण्यात येते. हे उत्पादन भुरी (Powdery Mildew), करपा (Anthracnose) आणि पानांवरील ठिपके (Leaf Spots) यांसारख्या रोगांवर नियंत्रण देते, ज्यामुळे शेतकर्यांना उच्च दर्जाचे उत्पादन मिळते.
हे उत्पादन (Crop Protection Products) मिरची पिकांसाठी गेम चेंजर ठरणार आहे. हे एक ब्रॉड-स्पेक्ट्रम सोल्यूशन आहे जे भुरी, पानांवरील ठिपके आणि करपा यासारख्या अनेक प्रकारच्या रोगांपासून अनेक प्रकारच्या पिकांचे संरक्षण करते.
एका अंदाजानुसार जगभरातील शेतकरी दरवर्षी बुरशीजन्य रोगांमुळे त्यांची 23 टक्के पिके गमावतात. मिराव्हिस ड्युओ पिकांना मजबूत आणि विश्वासार्ह रोग संरक्षण देते, ज्यामुळे उत्पादकांना चांगल्या दर्जाचे उत्पन्न मिळेल, व गुंतवणुकीवरील परताव्यात लक्षणीय वाढ होईल असेही कंपनी कडून सांगण्यात येत आहे.
रिफ्लेक्ट टॉप: हे भारतातील मुख्य अन्न, भातासाठी तयार केलेले एक विशेष बुरशीनाशक आहे. हे शीथ ब्लाइट (Sheath Blight Of Rice) या रोगापासून प्रभावी संरक्षण प्रदान करते, दीर्घकाळ रोग नियंत्रण सुनिश्चित करते आणि पिकास मजबूत पाया प्रदान करते.
सिंजेंटा इंडियाचे कंट्री हेड आणि व्यवस्थापकीय संचालक सुशील कुमार म्हणाले, “सिंजेंटा येथे, आम्ही उत्पादकांच्या आव्हानांना प्रगत उपाय ऑफर करून शेतीचा कायापालट करण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
शेतकर्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि संतुलित कृषी पर्यावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनांनी सुसज्ज करत आहोत, असेही ते म्हणाले.