हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : लॉकडाऊनच्या काळात दूधाचे दर तब्बल १२ रूपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे नफा तर सोडाच पण लिटरमागे ६ ते ८ रुपये तोटा दूध उत्पादकांना सहन करावा लागत आहे. यामुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकरी दूध दरासाठी १७ जून रोजी महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहेत.
किसान सभेच्या राज्य कौन्सिलच्या झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.कोरोना काळामध्ये दुधाची मागणी घटल्याचे कारण सांगून दूध संघांनी शेतकऱ्यांची लूट केल्याचा आरोप सध्या होत आहे. सध्या दुधाचे भाव पडलेले आहेत. दूध उत्पादकांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे. परंतु सध्या तो मिळत नाही. याविरोधात किसान सभेची बैठक झाली होती.किसान सभा दूध दराबाबत तक्रार घेऊन राज्यभरातील अधिकाऱ्यांकडे जाणार आहे. यात सर्वांनी सहभागी व्हावे यासाठी डॉ. अशोक ढवळे आणि डॉ. अजित नवले यांनी आव्हान केले आहे. दुधाची मागणी घटली असल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागला आहे.