हॅलो कृषी ऑनलाईन: नाफेड खुल्या बाजारात बफर स्टॉक मधील कांदा (Onion Rate Today) विक्रीसाठी दाखल करणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मीडिया रिपोर्ट नुसार लवकरच नाफेड कडून खुल्या बाजारात बफर स्टॉक (Onion Buffer Stock) मधील कांदा विक्रीसाठी उतरवला जाण्याची शक्यता आहे. यामुळे सहाजिकच कांद्याची उपलब्धता वाढून बाजार भाव घसरण्याची भीती आहे. दरम्यान आज कांद्याला बाजारात काय भाव (Onion Rate Today) आहे ते जाणून घेऊ या.
अद्ययावत बाजार दरांनुसार, आज महाराष्ट्रात (Maharashtra Onion Market) कांद्याला सरासरी दर ₹ 2883.33 प्रति क्विंटल एवढे आहे. कांद्याला सर्वात कमी बाजारभाव (Onion Rate Today) ₹2000 प्रति क्विंटल एवढा आहे. तर जास्तीत जास्त बाजारभाव ₹3800 प्रति क्विंटल मिळालेला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत (Pune Bajar Samiti) आज कांद्याला किमान 2000, कमाल 3800 अन सरासरी 2900 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
नाशिक लासलगाव (Nashik Lasalgaon) बाजार समितीत कांद्याला (Onion Rate Today) किमान 1,700, कमाल 3,421 अन सरासरी 3,311 रू प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
सोलापूरच्या अकलूज बाजारात कांद्याला किमान 1500, कमाल 4000 अन सरासरी 2800 असा भाव मिळाला आहे.
अहमदनगरच्या पारनेर बाजारात कांद्याला किमान 1500, कमाल 4200 अन सरासरी 3500 असा भाव मिळाला आहे.
अकोला बाजार समितीत कांद्याला किमान 2000, कमाल 4000 अन सरासरी 3500 असा भाव मिळाला आहे.
नागपूर बाजार समितीत लाल कांद्याला किमान 3000, कमाल 4000 अन सरासरी 3750 असा भाव मिळाला आहे.
20 ऑगस्ट 2024 रोजी उन्हाळी कांद्याला मिळालेले भाव
नामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीत काल उन्हाळी कांद्याला किमान 1500, कमाल 3860 अन सरासरी 3450 असा भाव मिळाला आहे.
उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीत काल उन्हाळी कांद्याला किमान 1500, कमाल 3611 अन सरासरी 3200 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत काल उन्हाळी कांद्याला किमान 1201, कमाल 3751 आणि सरासरी 3400 असा भाव मिळाला आहे.
कोपरगाव शिरसगाव तिळवणी कृषी उत्पन्न बाजार समितीत काल उन्हाळी कांद्याला किमान 2 हजार, कमाल कमाल 3740 अन सरासरी 3600 असा भाव मिळाला आहे.
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत काल उन्हाळी कांद्याला किमान 1 हजार, कमाल 3696 अन सरासरी 3450 असा भाव मिळाला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत काल उन्हाळी कांद्याला किमान 1600, कमाल 3542 अन सरासरी 3460 असा भाव मिळाला आहे.