Gaon Tithe Godam Yojana: शेतकर्‍यांचा शेतमाल साठवण्यासाठी ‘गाव तेथे गोदाम’ योजना; जाणून घ्या सविस्तर माहिती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची सुरक्षित साठवणूक (Gaon Tithe Godam Yojana) करण्यासाठी आणि नुकसानीचे टाळण्यासाठी, तसेच कमी भावाने माल विकावा लागू नये यासाठी “गाव तेथे गोदाम” योजना महाराष्ट्र शासनाने (Maharashtra Government Scheme) जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी प्रक्रिया उत्पादने आणि कृषी अवजारे साठवण्यासाठी गोदामांची सुविधा (Agriculture Warehousing) पुरवली जाईल.

या योजनेची (Gaon Tithe Godam Yojana) घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना केली. योजनेच्या पहिल्या टप्प्यातनवीन 100 गोदामांचे बांधकाम आणि दुरुस्ती केली जाणार आहे. कांदा आणि कापसाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी प्रत्येकी 200 कोटी रुपयांच्या फिरता निधीची निर्मिती केली जाणार आहे.

‘गाव तेथे गोदाम’ योजनेचे उद्देश (Gaon Tithe Godam Yojana)

  • शेतमालाची सुरक्षित साठवणूक (Storage Of Farm Produce) करणे
  • शेतमालाचे नुकसान टाळणे
  • शेतमाल कमी भावाने विकावा लागू नये
  • ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करणे

योजनेची वैशिष्ट्ये (Gaon Tithe Godam Yojana)

  • राज्यातील लहान, मध्यम आणि मोठ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे.
  • शेतमाल, प्रक्रिया उत्पादने आणि कृषी अवजारे साठवण्यासाठी गोदाम उपलब्ध होणार आहे.
  • या योजनेसाठी महाराष्ट्र सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या अंतर्गत समिती स्थापन करण्यात आलेली आहे.
  • नॅशनल बॅंक फॉर ॲग्रीकल्चर ॲण्ड रूरल डेव्हलपमेंट (NABARD) च्या सहकार्याने ही योजना राबवली जाईल.

योजनेचे लाभ

  • शेतमालाची सुरक्षित साठवणूक करण्यासाठी गोदामांची सुविधा उपलब्ध होणार
  • शेतमालाचे नुकसान टाळले जाऊन गुणवत्ता राखली जाईल
  • शेतकर्‍यांना शेतमाल कमी भावाने विकावा लागू नये यासाठी मदत होईल
  • शेतकर्‍यांना आर्थिक सुरक्षा प्राप्त होईल

पात्रता

राज्यातील सर्व प्रकारचे शेतकरी या योजनेचा (Scheme For Farmers) लाभ घेऊ शकतात. (लहान, मध्यम आणि मोठे शेतकरी) विशेषतः ग्रामीण भागात राहणारे शेतकरी

गाव तेथे गोदाम योजना 2024 महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज कसा करावा?

  • योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
  • अर्ज फॉर्म महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असतील.
  • आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा लागेल.

अधिक माहितीसाठी संपर्क

योजनेसाठी (Gaon Tithe Godam Yojana) अधिक माहिती आणि अर्ज प्रक्रियेबद्दल जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी कृपया महाराष्ट्र शासनाच्या वेबसाइटला भेट द्या.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.