Mainmula Plant: बहुगुणी औषधी वनस्पती माईनमुळा; रोपे मिळवण्यासाठी ‘येथे’ संपर्क करा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: आज आम्ही तुम्हाला अशा उपयुक्त औषधी वनस्पती (Mainmula Plant) बद्दल सांगणार आहोत जिचा वापर वेगवेगळ्या आजारावर केला जातो. या अतिशय उपयुक्त वनस्पतीचे नाव आहे ‘माईनमुळा’ (Mainmula Plant). या वनस्पतीला संस्कृत मध्ये पाषाणभेद, हिंदीत पत्थरचूर या नावाने सुद्धा ओळखतात. या वनस्पतीच्या मुळांना बाजारात चांगली मागणी असते.

माईनमुळ्याचा उपयोग (Mainmula Benefits) श्वासासंबंधी रोग, रक्तदाब व पर्यायाने येणारे हृदयरोग व कॅन्सर यासारख्या आजारांवर होतो. माईनमुळ्याची भाजी, कोशिंबीर व लोणचे (Mainmula Pickle) यांचा आहारात वापर केल्यास, यासर्व रोगांचे त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.
पूर्वी हातकणंगले परिसरातील वडगाव, हेरले, नागाव या तीन चार गावांतच माईनमुळा (Mainmula Plant) लावला जाई. आता इतरत्रही लागवड होऊ लागली आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली व सातारा परिसरात या औषधी वनस्पतीची आंतरपीक (Mainmula As Intercropping) म्हणून लागवड केली जाते.

माईनमुळ्याची लागवड (Mainmula Farming)

साधारणपणे जुलै ॲागस्ट महिन्यात या वनस्पतीची लागवड केली जाते.

सर्वसाधारणपणे या वनस्पतीस 10 ते 25 अंश से. तापमान व 83 ते 95 टक्के आर्द्रता मानवते. परंतु, उष्ण हवामान व कमी प्रमाणात आर्द्रता असल्यास पाणी दिल्याने वनस्पतीची वाढ चांगली होते. लागवडीस निचरा होणारी, रेताड, गाळाच्या जमिनी चांगल्या असतात. लागवड ही खोडाच्या छाट कलमाद्वारे करतात.

माईनमुळ्याच्या (Mainmula Plant) दोन जातीची लागवड शेतकरी करतात उग्र वासाची जात औषधीसाठी वापरली जाते, तर सौम्य वास असलेल्या जातीचे लोणचे करतात.

माईनमुळ्याच्या झुडुपास फुलांचे तुरे आले की ते खुडुन टाकतात. म्हणजे मुळे चांगली वाढतात. या वनस्पतीला कीड लागत नाही. मात्र बुरशी लागु नये म्हणून झाडांवर निंबोणीच्या अर्काची फवारणी करावी लागते.

लागवडीनंतर साधारणपणे 140 ते 150 दिवसांनी मुळे काढण्यास तयार होतात. एकरी 5 टन माईनमुळ्यांचे उत्पादन होऊ शकते.

माईनमुळ्याच्या झुडुपास (Mainmula Plant) फुलांचे तुरे आले की ते खुडून टाकतात. म्हणजे मुळे चांगली वाढतात. या वनस्पतीला कीड लागत नाही. मात्र बुरशी लागू नये म्हणून झाडांवर निंबोणीच्या अर्काची फवारणी करावी लागते. लागवड केल्यापासून साडे तीन चार महिन्यात मुळे तयार होतात.

मुळे अवघी अर्धा इंच ते पाऊण इंच जाडीची असतात. चार ते सहा इंच लांबीची असतात. त्यावर बारीक बारीक मुळे आणि त्यात अडकलेली माती असते. मुळे घरी आणल्यावर, साफ करणे जिकिरीचे काम असते.

माईनमुळा साधारण नोव्हेंबर,डिंसेबर मधे बाजारात मिळतो. या कालावधीत मुंबईलाही माईनमुळा मिळतो.

या औषधी वनस्पतीला (Medicinal Crop) बाजारात 30,000 रुपये टन भाव मिळतो. यापासून तीन ते चार महिन्यातच शेतकरी लाखो रुपयाचा फायदा मिळवतात.

रोपे कुठे मिळतील

माईनमुळ्याची रोपे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील नागार्जुन औषधी वनस्पती गार्डन येथे विक्रीस उपलब्ध आहे.  

माईनमुळा शेती करणारे शेतकरी

बाळासाहेब कर्नाळे – संपर्क क्रमांक 94044 03015

तसेच हातकणंगले परिसरातील वडगाव, हेरले, नागाव या गावात सुद्धा माईनमुळ्याची (Mainmula Plant) शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. या परिसरात रोपे आणि बियाणे उपलब्ध होऊ शकतात.

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.