Home Remedies For Increasing Cattle Milk: या घरगुती सोप्या उपायाने जनावरांमध्ये दुधाचे प्रमाण वाढवा!जाणून घ्या संपूर्ण माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: तुम्हालाही तुमच्या जनावरांची दूध देण्याची क्षमता (Home Remedies For Increasing Cattle Milk) वाढवायची असेल, तर हा घरगुती उपाय तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची आणि मेहनत करण्याचीही गरज नाही.

आजच्या काळात गायी-म्हशींचे अधिकाधिक दूध घेण्यासाठी (Milk Production) पशुपालक वेगवेगळ्या लसी (Vaccine To Increase Milk Production In Cattle) किंवा इतर पद्धतींची मदत घेतात. या उपायांनी सुरुवातीला परिणाम दिसत असले तरी काहीवेळा त्याचा जनावरांवर विपरीत परिणाम होतो, त्यामुळे शेतकरी आणि पशुपालकांना (Dairy Farmers) अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पण तुम्हाला माहीत आहे का की विविध घरगुती उपायांचा अवलंब करून पशुपालक गायी आणि म्हशींपासून अधिक दूध मिळवू शकतात. या लेखात आम्ही तुम्हाला काही उत्तम रामबाण घरगुती उपाय (Home Remedies For Increasing Cattle Milk) सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने गायी आणि म्हशींची दूध देण्याची क्षमता वाढेल.

हे घरगुती घरगुती (Home Remedies For Increasing Cattle Milk) उपाय खूप सोपे आणि प्रभावी आहेत. यासाठी तुम्हाला जास्त मेहनत आणि पैसा खर्च करण्याची गरज नाही. चला तर जाणून घेऊ या घरगुती उपायांबद्दल.

गायी आणि म्हशींमध्ये दुधाचे प्रमाण वाढवण्याचे उपाय (Home Remedies For Increasing Cattle Milk)

गायी म्हशींमध्ये दूध वाढवण्याच्या पद्धतीसाठी काही साहित्यांची आवश्यकता असेल. ते साहित्य असे काही आहे.

साहित्य: 250 ग्रॅम गहू दलिया, 100 ग्रॅम गुळाचे सरबत (आवटी), 50 ग्रॅम मेथी, कच्चा नारळ, 25-25 ग्रॅम जिरे आणि ओवा इ.

कृती: प्रथम दलिया, मेथी आणि गूळ शिजवून घ्या, नंतर नारळ बारीक करून घाला. ते थंड झाल्यावर जनावरांना खायला द्यावे. हे घटक फक्त सकाळी रिकाम्या पोटी 2 महिने खायला द्या. वासरांना जन्म देण्याच्या एक महिना आधी आणि व्यायल्यानंतर एक महिन्यापर्यंत गायीला द्यायला सुरुवात करा.

प्रत्येकी 25 ग्रॅम जीरा आणि ओवा व्यायल्यानंतर फक्त 3 दिवस गायींना द्या. खूप चांगले परिणाम मिळू शकतात.

• व्यायल्यानंतर 21 दिवस गायीला सामान्य आहार द्या.

गायीचे वासरू 3 महिन्यांचे झाल्यावर किंवा गायीचे दूध कमी झाल्यावर गायीला 30 ग्रॅम/दिवस जवस औषध म्हणून द्यावे, दूध कमी होणार नाही.

गाई आणि म्हशींसाठी औषध

200 ते 300 ग्रॅम मोहरीचे तेल, 250 ग्रॅम गव्हाचे पीठ, दोन्ही एकत्र करून संध्याकाळी जनावरांना चारा-पाणी झाल्यावर खायला द्यावे. लक्षात ठेवा यानंतर पाणी देऊ नये आणि हे औषधही पाण्यासोबत देऊ नये. अन्यथा जनावराला खोकल्याचा त्रास होऊ शकतो. जनावरांना दिलेला हिरवा चारा, सरकी इत्यादी खाद्य चालू ठेवावे लागते. 7-8 दिवस आहार द्या आणि नंतर औषध बंद करा

Rupali Kapse
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc Agri चे शिक्षण पूर्ण. मागील २० वर्षांपासून विविध प्रिंट माध्यमात कार्यरत. बळीराजा मासिक, ऍग्रो इंडिया मॅगझीन, कृषिकिंग आदी माध्यमांत उपसंपादक म्हणून कामाचा अनुभव. Kheti buddy, वावर आदी मोबाईल अँप येथे काम.