Maize : ‘या’ बाजार समितीमध्ये मक्याला मिळाला 2900 इतका उच्चांकी दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हेलो कृषी ऑनलाईन : भात आणि गहू या पिकांनंतर मका (Maize) हे तिसरे महत्त्वाचे पीक मानले जाते. अन्नधान्याव्यतिरिक्त पशुखाद्य, जनावरांच्या चाऱ्यासाठी मकेला मागणी जास्त आहे. जनावरांना पौष्टिक चारा म्हणून अनेक पशुपालक मकेचा मुरघास तयार करतात. जनावरांच्या आहारात मकेच्या मुरघासाचा समावेश केल्यास जनावरांच्या दुग्धोत्पादनात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बहुतांश पशुपालक जनावरांच्या आहारात मुरघासाचा समावेश करत आहे. त्याचप्रमाणे पशुखाद्यामध्ये सुद्धा मकेचा समावेश केला जातो. कुक्कुटपालन उद्योगातही मकेला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

मक्याची (Maize) आवक कमी

जालना कृषी बाजार उत्पन्न समितीमध्ये मकेची आवक दोन अंकी आहे. पाऊस पण कमी असल्याने उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. मका (Maize) पिकाचे कमी झालेले उत्पादन आणि मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने मकेला जालना कृषी बाजार समितीमध्ये 2500 ते 2900 रु. प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे तर नवीन मकेला 2200 ते 2400 रु. प्रति क्विंटल असा दर मिळत आहे.

मक्याच्या (Maize) दरात 400 ते 500 रु. प्रति क्विंटलने वाढ

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मध्यंतरी मक्याचे दर स्थिर होते, परंतु मागील पंधरा दिवसांमध्ये मक्याचे भाव वाढले आहेत. त्याचे कारण म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केले आहेत. यंदा कुणाकडेच मक्याचा स्टॉक नसल्याने आणि मकेला अधिक मागणी असल्याने मक्याचे भाव वाढले आहेत. जालना कृषी बाजार उत्पन्न समितीमध्ये दरवर्षी मक्याचे भाव हे 2500 रुपये प्रति क्विंटल च्या आत असतात. परंतु यंदा आवक कमी असल्याने मक्याचे दर 400 ते 500 रुपये प्रति क्विंटल ने वाढले आहेत. मागणी वाढत असल्याने दर असेच राहतील असे येथील व्यापारी सांगत आहेत.

Rahul Bhise
Bsc ऍग्रीचे शिक्षण पूर्ण झालेले असून शेती क्षेत्रात वार्तांकन करण्यामध्ये विशेष आवड. यशस्वी शेतकऱ्यांच्या कथा, शासकीय योजना, शेती प्रश्न आदी विषयांवर लिखाण करण्यात रस.