हॅलो कृषी ऑनलाईन: गायीच्या दुधाला प्रति लिटर सात रुपये अनुदान (Cow Milk Subsidy) देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना (Dairy Farmers) गायीच्या दुधासाठी (Cow Milk) लिटरमागे सात रुपयांचे अनुदान (Cow Milk Subsidy) देण्याचा निर्णय काल 23 सप्टेंबर 2024 ला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) होते.
यापूर्वी दूध उत्पादकांना प्रति लीटर पाच रुपये अनुदान (Cow Milk Subsidy) देण्यात येत होते. त्यामध्ये दोन रुपयांची वाढ करून ते सात रुपये देण्यात येईल. दूध उत्पादकांना दूध संघांनी 3.5 फॅट /8.5 एसएनएफ या प्रति करिता 1 ऑक्टोबर 2024 पासून 28 रुपये प्रति लिटर इतका दर देणे बंधनकारक आहे. त्यानंतर दूध उत्पादकांना शासनामार्फत सात रुपये प्रतिलिटर त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येतील. त्यामुळे या शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर 35 रुपये भाव यापुढेही मिळत राहणार आहे.
दूध अनुदानाचा (Cow Milk Subsidy) निर्णय 1 ऑक्टोबर 2024 पासून राबवण्यात येईल. मात्र तिचा आढावा घेऊन मुदतवाढ देण्यात येईल. या योजनेसाठी 965 कोटी 24 लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे.
दुधाला अनुदान मिळावे यासाठी विविध शेतकरी संघटनांनी आंदोलन केले होते. यावर तोडगा म्हणून गायीच्या दुधावर प्रति लिटर 5 रुपये अनुदान मान्य करण्यात आले होते. परंतु आता यात अजून दोन रूपयांची वाढ झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी यांच्यासाठी ही समाधानाची बातमी आहे.