हॅलो कृषी ऑनलाईन: परतीच्या मॉन्सूनने सध्या देशात (Tomato Market Rate Today) धुमाकूळ घातलेला आहे. महाराष्ट्रासह हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश आदी प्रमुख भाजीपाला उत्पादक राज्यांमध्ये (Vegetable Growing States) अतिवृष्टीमुळे भाजीपाला उत्पादनावर (Vegetable Production) परिणाम झाले आहे. पावसामुळे रस्ते खराब झाल्याने पुरवठा साखळी प्रभावित होऊन भाजीपाला दरात मोठी वाढ झाली आहे.
इतर भाजीपाला सोबतच टोमॅटोचे बाजारभाव (Tomato Market Rate Today) सुद्धा वाढलेले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात कांद्याप्रमाणे टोमॅटोची सुद्धा सरकार मार्फत अनुदानित दरात विक्री होण्याची शक्यता आहे.
टोमॅटोचे आजचे बाजारभाव (Tomato Market Rate Today)
उपलब्ध माहितीनुसार, आज महाराष्ट्रात टोमॅटोला सरासरी 2810.75 ₹/क्विंटल मिळालेला असून, कमीत कमी 500 ₹/क्विंटल आणि जास्तीत जास्त 5000 ₹ /क्विंटल बाजारभाव मिळालेला आहे.
आज ठाणे जिल्ह्यातील मुरबाड बाजारात टोमॅटोला कमीतकमी 3500 रु./क्विंटल जास्तीत जास्त 4500 रु./क्विंटल आणि सरासरी 4000 रु./क्विंटल बाजारभाव मिळालेला आहे.
आज पुणे येथील खेड (चाकण) बाजार समितीत टोमॅटोला कमीतकमी 2000 रु./क्विंटल जास्तीत जास्त 3000 रु./क्विंटल आणि सरासरी 2500 रु./क्विंटल बाजारभाव मिळालेला आहे.
पुणे बाजार समितीत कमीतकमी 1000 रु./क्विंटल जास्तीत जास्त 3500 रु./क्विंटल आणि सरासरी 2250 रु./क्विंटल बाजारभाव मिळालेला आहे.
मोशी समितीत कमीतकमी 2000 रु./क्विंटल जास्तीत जास्त 3000 रु./क्विंटल आणि सरासरी 2500 रु./क्विंटल बाजारभाव मिळालेला आहे.
रत्नागिरी (नाचणे) येथे टोमॅटोला कमीतकमी 2500 रु./क्विंटल जास्तीत जास्त 4500 रु./क्विंटल आणि सरासरी 3600 रु./क्विंटल बाजारभाव मिळालेला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर बाजार समितीत टोमॅटोला कमीतकमी 1500 रु./क्विंटल जास्तीत जास्त 3000 रु./क्विंटल आणि सरासरी 2500 रु./क्विंटल बाजारभाव मिळालेला आहे.
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर बाजार समितीत टोमॅटोला कमीतकमी 3025 रु./क्विंटल जास्तीत जास्त 3500 रु./क्विंटल आणि सरासरी 3315 रु./क्विंटल बाजारभाव मिळालेला आहे.
सांगली इस्लामपूर बाजारात टोमॅटोला कमीतकमी 2500 रु./क्विंटल जास्तीत जास्त 3500 रु./क्विंटल आणि सरासरी 3000 रु./क्विंटल बाजारभाव मिळालेला आहे.