हॅलो कृषी ऑनलाईन: हरियाणामध्ये पीक अवशेष जाळण्याच्या (Farm Stubble Burning) घटनांमध्ये घट झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2021 च्या तुलनेत 2024 मध्ये अवशेष जाळण्याच्या घटनांमध्ये सुमारे 60 टक्के घट झाली आहे. हरियाणा सरकारने (Haryana Government) शेतात अवशेष जाळणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेत त्यांच्या विरोधात रेड एन्ट्री नोंदवली आहे, ज्यामुळे दोषी शेतकरी पुढील 2 हंगामात त्यांची पिके आधारभूत किमतीत (MSP) बाजारात विकू शकणार नाहीत.
हवेचे वाढणारे प्रदूषण (Air Pollution) यामुळे हरियाणा सरकार शेतातील अवशेष जाळणाऱ्या (Farm Stubble Burning) शेतकऱ्यांच्या (Farmers) विरोधात कठोर पावले उचलत असल्याचे दिसत आहे. ज्याचा परिणाम आता राज्यात दिसून येत आहे. हरियाणामध्ये (Haryana) पाचट जाळण्याच्या घटनांमध्ये घट झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2021 च्या तुलनेत 2024 मध्ये अवशेष जाळण्याच्या घटनांमध्ये सुमारे 60 टक्के घट झाली आहे. हरियाणामध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये 680 सक्रिय फायर स्पॉट्स (एएफएल) नोंदवण्यात आले, तर 2021 मध्ये 1,726 स्टबल जाळण्याची नोंद झाली.
यावर्षी हरियाणा सरकार शेतातील अवशेष जाळणाऱ्या(Farm Stubble Burning) शेतकऱ्याविरोधात अतिशय सक्रिय मोडमध्ये आहे. राज्यभरातील 93 एफआयआरमध्ये 13 शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आणि दोषी आढळलेल्या शेतकऱ्यांवर 380 रेड एन्ट्री नोंदवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे ते शेतकरी पुढील 2 हंगामासाठी मंडईंमध्ये त्यांचे पीक MSP वर विकू शकणार नाहीत. याशिवाय, हरियाणा सरकारने 420 अधिकाऱ्यांवर विभागीय कारवाई देखील सुरू केली आहे, ज्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 21 ऑक्टोबरपर्यंत हरियाणातील 328 शेतकऱ्यांवर चालान जारी करण्यात आले आहे, ज्यामध्ये 8.35 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
500 पथके तयार केले
हरियाणा सरकारने अवशेष जाळण्याच्या (Farm Stubble Burning) घटनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यात पूर्णपणे गुंतले आहे. यासाठी कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासन एकत्रितपणे काम करत असून, यासाठी 500 पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके शेतकऱ्यांना प्रबोधन करतात, शिवाय जे शेतकरी पाचट जाळतात, त्यांच्यावरही लक्ष ठेवतात.
दरम्यान हरियाणा सरकारकडून होणार्या या कार्यवाही विरोधात देशातील काही भागातील शेतकर्यांमध्ये तीव्र संताप आणि चिंता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकर्यांच्या अडचणी वाढतील असे त्यांना वाटते. सध्या तरी शेतातील अवशेष जाळण्याच्या (Farm Stubble Burning) घटनांमध्ये घट ही सकारात्मक बदल आहे.